नागपूर: पोलिसांच्या अटकेपासून वाचण्यासाठी धडपडणाऱ्या अजित पारसेच्या पापात त्याचा एक शाळकरी मित्राही भागीदार असल्याचे समोर येत आहे. अजितने या मित्राच्या मदतीने अनेकांची कोट्यवधीने फसवणूक केल्याची माहिती आहे.पारसेने डॉ. मुरकुटेचे सीबीआयला बनावट पत्र दिले. ते तयार करण्यासाठी याच शाळकरी मित्राची मदत घेतल्याचे कळते. त्यामुळे पारसेच्या या मित्राच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

त्या शाळकरी मित्राकडे पारसेचा काळा पैसा असण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलीस आता त्याच्या भोवती सापळा रचणार असून येत्या काही दिवसांतच त्यालाही चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे. पारसेच्या काळ्या पैशांची विल्हेवाट तो मित्र लावत होता. अजितने खंडणीतून कमावलेला काळा पैसा पांढरा करण्याचे काम तो करीत होता, अशी धक्कादायक माहिती समोर येत आहे.

हेही वाचा : विदर्भातही ‘एक्सबीबी’ उपप्रकाराचे करोनाग्रस्त; नागपूर, भंडारा, अकोल्यात नोंद

डॉ. मुरकुटेंना सीबीआयची भीती का?

कोट्यधीश असलेले डॉ. राजेश मुरकुटे यांना होमियोपॅथी महाविद्यालय काढायचे होते. परंतु, पारसेने त्यांना सीबीआय चौकशी करणार असल्याची भीती दाखवली. डॉ. मुरकुटेंनी असा कोणता घोळ केला की थेट सीबीआय चौकशीच्या भीतीने ते घाबरले, असा प्रश्न आता पोलिसांसमोर असून पोलीस डॉ. मुरकुटेंचीही चौकशी करण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : बिबट्यांच्या लढाईत वाघाची “एन्ट्री” अन्……

अद्याप अटक नाहीच

पोलिसांना पारसेला अटक करून त्याचा जबाब घ्यायचा आहे. त्यामुळे तो वैद्यकीयदृष्ट्या सुदृढ असणे गरजेचे आहे. त्यासाठी पोलिसांनी रुग्णालय व्यवस्थापन आणि डॉक्टरांना पत्र दिले आहे. परंतु, डॉक्टरांनी पारसेला पूर्णपणे सुदृढ घोषित केले नाही. त्यामुळे त्याची अटक काही काळ आणखी लांबली आहे.