नागपूर : अजित पारसे याच्या न्यायालयीन अडचणीत वाढ झाली आहे. गुन्हे शाखेने पारसेच्या काळ्या कारनाम्याचा लेखोजोखा गुरुवारी न्यायालयासमोर ठेवत जामिनाला विरोध केल्याने त्याच्या जामिनावर येत्या १६ नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे.पारसेने दिल्लीत भागिदारीत ‘फाईव्ह स्टार’ हॉटेल टाकण्याच्या नावावर शहरातील प्रसिद्ध शेफला जाळ्यात ओढल्याची माहिती समोर आली आहे. तसेच एका केंद्रीय मंत्र्याच्या भविष्यातील प्रकल्पातही पारसेने हस्तक्षेप करीत केंद्र सरकारचा निधी लाटण्याचा प्रयत्न केला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वझलवार ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक मनिष वझलवार यांचीही पारसेने फसवणूक केली. पारसेने वझलवारकडून घेतलेला पैसा पत्नीला घटस्फोट देण्यासाठी वापरल्याची कबुली दिली. या प्रकरणी अंबाझरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पारसेने डॉ. मुरकुटेच्या फसवणुकीच्या गुन्ह्यातून जामीन मिळावा यासाठी न्यायालयात जामीन अर्ज केला होता. जामीन अर्जावर गुरुवारी सुनावणी झाली. त्यावेळी गुन्हे शाखेने जामिनाला विरोध केला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit parse court trouble escalates in nagpur tmb 01