तोतया समाज माध्यम विश्लेषक अजित पारसेने अनेकांकडून उकळलेल्या खंडणीतील मोठी रक्कम रोखे बाजारात गुंतवली आहे. त्यामुळे गुन्हे शाखेने संबंधित विभागासोबत ‘ईमेल’द्वारे पत्रव्यवहार केला आहे. पारसेने गुंतवणूक केलेल्या सर्वच खात्याची माहिती पोलिसांनी मागवली आहे. त्यामुळे पारसेचे कोट्यवधींचे घबाड बाहेर निघण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>>काँग्रेसप्रणीत ‘इंटक’मध्ये फूट? ; ‘एसटी’कडे दोन गटांकडून वेगवेगळय़ा पदाधिकाऱ्यांची यादी

पारसेने काही व्यापाऱ्यांना, उद्योजकांना ‘पीएमओ’ कार्यालयातील अधिकाऱ्यांशी ओळखी असल्याचे सांगून अनेक कोटींची वसुली केली आहे. वसुली केलेल्या पैशातील मोठी रक्कम त्याने रोखे बाजारात गुंतवली होती. त्या गुंतवणुकीचे कागदपत्र पोलिसांच्या हाती लागले. त्यामुळे पोलिसांनी ‘स्टॉक एक्स्चेंज’ला पारसेच्या ‘डी-मॅट अकाऊंट’ची मागणी केली असून येत्या दोन दिवसांत त्याने किती रक्कम गुंतवली होती, याबाबत माहिती मिळणार आहे. शहरातील धनाढ्य महिलांशी मैत्री करून त्याने लाखो रुपये उकळल्याची माहिती समोर आली आहे. अजितविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर पारसेच्या घरात पोलिसांनी छापा घातला होता. पोलिसांनी काही सोन्याचे दागिने, काही संपत्तीचे कागदपत्र, ८ मोबाईल आणि ४ लॅपटॉसह काही दस्तावेज जप्त केले आहे. पोलिसांनी पारसेच्या फसवणुकीच्या गुन्ह्याचा छडा लावल्यानंतर चार वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच पोलीस त्याला अटक करण्यास टाळाटाळ करीत असल्याची माहिती आहे. व्यसनुक्ती केंद्रातून पारसेची रवानगी सध्या एका खासगी रुग्णालयात करण्यात आली आहे.

काळ्या कृत्यात सहभागी कोण?

हेही वाचा >>>लोकजागर : गडचिरोलीवर ‘राज्य’ कुणाचे?

जित पारसेच्या कार्यालयात काम करणाऱ्या नोकरांची गुन्हे शाखेने चौकशी केली. सर्वच नोकरांच्या घरात छापेमारी करण्यात आली. नोकराच्या घरातून पारसेबाबत पोलिसांच्या हाती काय लागले, याबाबत अद्याप गुप्तता ठेवण्यात आली आहे. डॉ. मुरकुटे यांच्याकडून २० लाखांची खंडणीची रक्कम त्याच्या कारचालकाने अजितला आणून दिल्याची माहिती आहे. त्यामुळे पारसेच्या काळ्या कृत्यात कोण-कोण सहभागी आहेत, याचा तपास पोलीस करीत आहेत.

आईच्या नावावर असलेले ‘लॉकर’ उघडणार?
अजित पारसेने मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने खरेदी केले आहेत. पारसेच्या घरात सापडलेल्या दागिने खरेदीच्या पावत्यांवरून पोलिसांनी काही सराफा दुकानदारांकडून गेल्या पाच वर्षांतील सोने खरेदीची माहिती मागितली आहे. पारसेने मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केले असून ते त्याच्या आईच्या लॉकरमध्ये ठेवल्याचे बोलले जाते. त्यामुळे पोलीस विशेष परवानगी घेऊन लॉकर उघडणार आहेत, अशी माहिती आहे.