अजित पवार यांना मुख्यमंत्री करा. मी पाठिंबा देतो आणि सभागृहात ठराव मांडतो. मला तुमचं दम बघायचा आहे. माझ्या पक्षाची हमी मी घेतो, असं आव्हान शिवसेना ( ठाकरे गट ) भास्कर जाधव भाजपाला दिलं आहे. ज्याच्याबरोबर मैत्री कराल, त्याचं वाटोळं केल्याशिवाय राहत नाही, अशी टीकाही भास्कर जाधवांनी भाजपावर केली आहे. ते विधानसभेत बोलत होते.

“अजित पवार महाविकास आघाडी सरकारमध्ये होते. पण, काहींना सकाळ संध्याकाळ अडीच वर्षे खूप खुपत आहेत,” असं विधान भास्कर जाधवांनी केलं.

हेही वाचा : “जे दादांना कळलं, ते तुम्हाला कळलं नाही”, जयंत पाटलांचा शिंदे, फडणवीसांना टोला; अजित पवार म्हणाले…

त्यावर, “अजित पवारांना मुख्यमंत्री केलं असतं, सगळंचं खुपलं असतं,” असं वक्तव्य विधानसभेत एका सदस्यानं केलं.

“मला तुमच्यात दम बघायचा आहे”

याला प्रत्युत्तर देताना भास्कर जाधव म्हणाले, “आता अजित पवारांना मुख्यमंत्री करा. मी पाठिंबा आणि सभागृहात ठराव मांडतो. मला तुमच्यात दम बघायचा आहे. माझ्या पक्षाची हमी मी घेतो. ज्याच्याबरोबर मैत्री कराल, त्यांचं वाटोळं केल्याशिवाय राहत नाही.”

“भाजपामुळे करोना आला आणि महाराष्ट्र ठप्प झाला”

“भाजपाला सतत अडीच वर्षे… अडीच वर्षे दिसतात… भाजपानं करोना आणला. का करोना आणला? का वेळेवर विमानांची उड्डाणे बंद केली नाहीत. तिकडे झोपाळ्यावरून बसून ढोकळा आणि फापडा खात बसले आणि मग देश बंद केला. भाजपामुळे करोना आला आणि महाराष्ट्र ठप्प झाला,” असं टीकास्र भास्कर जाधवांनी सोडलं आहे.

हेही वाचा : “मलिकांना एक आणि पटेलांना दुसरा न्याय का?” उद्धव ठाकरेंच्या सवालावर फडणवीस प्रत्युत्तर देत म्हणाले…

“जागतिक आरोग्य संघटनेनं महाविकास आघाडी सरकारचं कौतुक केलं”

“उत्तरप्रदेशमध्ये गंगेत तर मध्य प्रदेश आणि गुजरातात रस्त्यावर मृतदेह पडले होते. महाराष्ट्रात सन्मानाने अंतविधी होत होता, ते तुम्हाला खुपत आहे. जागतिक आरोग्य संघटना, सर्वोच्च न्यायालय, राष्ट्रपती आणि जगानं महाविकास आघाडी सरकारचं कौतुक केलं आहे,” असं भास्कर जाधवांनी सांगितलं.

Story img Loader