राज्यात मोठय़ा प्रमाणात खाजगी शिक्षण संस्था कार्यरत असताना त्यांच्या अडचणी जाणून घेणे महत्त्वाचे आहे. आज राज्यस्तरावर आराखडा तयार नसताना नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबाजावणी कशी करणार, असा प्रश्न उपस्थित करत विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राज्य सरकारच्या शैक्षणिक धोरणावर टीका केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ, नागपूर विभागाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या शिक्षण संस्थाचालकाचे अधिवेशनाचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.आजच्या शैक्षणिक धोरणाबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. एखाद्या पदासाठी किंवा विभागासाठी जर कोणी उत्सुक नसेल तर ते तेवढय़ा उत्साहाने काम करत नसल्याचे सांगत पवार यांनी दीपक केसरकर यांच्यावर नाव न घेता टीका केली. विजय नवल पाटील यांनी शिक्षण क्षेत्रातील आव्हानांकडे राज्य आणि केंद्र सरकारने वेळीच लक्ष देऊन विद्यार्थी हितासाठी सकारात्मक तोडगा काढण्याकडे लक्ष वेधले.