लोकसत्ता टीम

नागपूर : राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी विदर्भात एकही प्रचार सभा न घेताही राष्ट्रवादीला (अजित पवार) घवघवीत यश मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचाहविश्वास दुणावला आहे. जिल्ह्यात एकही आमदार नसला तरी आम्ही नागपूर महापालिकेच्या निवडणुकीत ४० जागा लढण्याचा विचार करीत आहोत,असे राष्ट्रवादीचे ( अजित पवार) शहर अध्यक्ष प्रशांत पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

strong earthquake near Maharashtra Telangana border tremors felt up to Chandrapur
महाराष्ट्र तेलंगणा सीमावर्ती भागात भूकंपाचे धक्के
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
no need for Rahul Gandhi to take out yatra against EVMs says Prakash Ambedkar
‘‘ईव्हीएमविरोधात राहुल गांधींनी यात्रा काढण्याची गरज नाही”, प्रकाश आंबेडकर यांचे मत; म्हणाले…
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा
Manoj Jarange News
Manoj Jarange : “मराठे निवडणूक लढवणार नाहीत, कारण एका जातीवर…”; मनोज जरांगेंची मोठी घोषणा
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?

राष्ट्रवादीला (अजित पवार) विधानसभेत ४१ जागांवर मिळाल्या आहेत. या पक्षाने नागपूर जिल्ह्यात केवळ काटोल येथे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे नाम साध्यर्म असलेल्या शेत मजूराला काटोल येथून उमेदवारी दिली होती. तो पराभूत झाला आहे. मात्र, विदर्भात सहा जागा या पक्षाला मिळाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेत बोलताना शहराध्यक्ष प्रशांत पवार म्हणाले, येत्या दोन महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका होणार आहेत,. नागपूर महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा ४० जागांवर निवडणूक लढवणार आहे. शहर कार्यकारीणीच्या बैठकीत ठराव करण्यात आला.

आणखी वाचा-‘‘ईव्हीएमविरोधात राहुल गांधींनी यात्रा काढण्याची गरज नाही”, प्रकाश आंबेडकर यांचे मत; म्हणाले…

राष्ट्रवादीने गेल्या दोन वर्षात शहरातील विविध भागांत जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आंदोलने केली, मोर्चे काढली, रस्ते, गडर लाईन, पाण्याची समस्या सोडवण्यात पक्षाला यश मिळाले. जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी पक्ष नेहमीच कार्य करीत राहला आहे आणि येत्या पालिकेच्या निवडणुकीत जनतेने मोठया प्रमाणात नगरसेवक निवडणूक दिल्यास आणखी कामे करू, असे प्रशांत पवार म्हणाले.

लोकसभा निवडणुकीत गडकरी यांच्या प्रचारासाठी आणि विधानसभा निवडणुकीत प्रचारासाठी राष्ट्रवादीने मेहनत केली. आता महापौर महायुतीचा करण्याचे आमचा निश्चय आहे. राष्ट्रवादी पूर्ण ताकदीने महापालिकेची निवडणूक लढवणार आहे. इच्छुक उमेदवार मागील वर्षभरापासून आपल्या प्रभागात तयारीला लागले आहेत. मोठ्या संख्येने नगरसेवक महापालिकेवर जिंकून आणू, असा विश्वासही प्रशांत पवार यांनी व्यक्त केला. यावेळी शहरातील सर्व सहाही विधानसभा मतदारसंघांचे पदाधिकारी, विविध आघाड्यांचे प्रमुख उपस्थित होते.