लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : अजित पवार हे सत्तेसाठी नाही तर ईडीमुळे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत गेले आहे. हे महाराष्ट्रातील जनतेला माहीत असल्यामुळे आगामी निवडणुकीत त्याचे परिणाम दिसेलच, अशी टीका विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. विजय वडेट्टीवार प्रसार माध्यमांशी नागपुरात बोलत होते.

बारामतीच्या सभेत अजित पवार, मी त्यावेळी मुख्यमंत्री झालो असतो असे म्हणाले. याचा अर्थ मुख्यमंत्रीपदाची सुप्त इच्छा पूर्ण करण्यासाठी अजित पवार गेले हे समजू शकतो. मात्र असे असले तरी अजित पवार सत्तेसाठी गेले नाही तर ईडीच्या भीतीमुळे गेले आहेत. राष्ट्रवादी शंभर टक्के फुटलेली आहे, नऊ आमदार फुटल्यामुळे हे आता स्पष्ट झालं आहे. अजित पवारांना पंतप्रधान नरेंद्र मोदीचे गुणगान करण्याचा दृष्टांत दहा वर्षापूर्वी का झाला नाही. आत्ताच का झाला ते त्यांनाच माहीत, असे वडेट्टीवार म्हणाले.

आणखी वाचा-बावनकुळे म्हणतात, “वडेट्टीवार उद्या काय बोलायचे आहे ते रात्रीच लिहून ठेवतात…”

मनसेकडून मुंबई गोवा पदयात्रा काढली जात आहे. तो रस्ता खराब झाला ते योग्य आहे, यापूर्वी आंदोलन होण्याची गरज होती, समृद्धीपेक्षा तो रस्ता जास्त महत्वाचा आहे, अनेक जण कोकणात जातात. तो रस्ता जीव घेणारा आहे. त्या रस्त्यावर आंदोलन होत असतील तर नक्कीच रस्ता दुरुस्त होईल, असेही वडेट्टीवर म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar joined government not for power but because of ed comment by vijay wadettiwar vmb 67 mrj
Show comments