नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्ह आपल्या गटाकडे राखण्यास यशस्वी झालेल्या अजित पवार यांना राज्यात पक्षाची शक्ती टिकवून ठेवण्यात अडचणींचा सामना करावा लागत आहेत. त्यातच आता विदर्भातील राष्ट्रवादीच्या (अजित पवार) सर्व दहा जिल्हाध्यक्षांमध्येही धुसफूस दिसून येऊ लागली आहे.

विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात प्रफुल्ल पटेल, गडचिरोली जिल्ह्यातील बाबा आत्राम आणि बुलढाणा जिल्ह्यातील राजेंद्र शिंगणे आणि यवतमाळ जिल्ह्यातील इंद्रनील नाईक हे नेते अजित पवार गटासोबत आहेत. त्यांच्या त्या-त्या जिल्ह्यातील काही मतदारसंघावर प्रभाव आहे. यातील राजेंद्र शिंगणे शरद पवार गटात कधीही जाऊ शकतात, अशी स्थिती आहे. या व्यतिरिक्त विदर्भात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत कोणालाही महत्वाचे स्थान नाही. अजित पवार गटात येऊनही राजकीय लाभ मिळत नसल्याने या पक्षाचे जिल्हाध्यक्ष नाराज आहे. ते विधानसभा निडवणुकीआधी अधिक सक्रिय झाले आहेत.

Ajit Pawar
Ajit Pawar : “…तेव्हा आई देवाचा जप करत बसली होती”, अजित पवारांनी सांगितला विधानसभेच्या निकालाच्या दिवशीचा किस्सा
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
Ajit Pawar On Santosh Deshmukh Case
Santosh Deshmukh Case : “मास्टरमाईंड कोणी असो, त्याला सोडणार नाही”, अजित पवारांचं संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना आश्वासन
Sharad Pawar
“राज्यात दहशतीचं वातावरण, कृपा करा अन्…”, शरद पवारांकडून मस्साजोगच्या ग्रामस्थांना धीर; म्हणाले, “आता आपण सगळ्यांनी…”
ajit pawar visit massajog
शरद पवारांपाठोपाठ आता अजित पवारही मस्साजोगला भेट देणार
buldhana protest against home minister amit shah
अमित शहांचा पुतळा जाळला…राष्ट्रमाता जिजाऊंच्या माहेरी जमलेल्या आंदोलकांनी…
Congress protest against BJP , Congress Mumbai office attack , Congress Nagpur protest ,
कॉंग्रेस कार्यालयावरील हल्ला, मविआचे आंदोलन; म्हणाले “महायुतीची महागुंडशाही…”
loksatta readers feedback
लोकमानस: आठवले काहीच बोलणार नाहीत का?

हेही वाचा – नागपुरात भिकारी गोळा केले… आलिशान गाडीत बसवले आणि थेट…

राज्यात महायुतीचे सरकार आहे. परंतु पक्षाच्या जिल्हाध्यक्षांची कामे केली जात नाहीत. लोकसभा निवडणुकीत विदर्भातील अजित पवार गटाला एकही जागा मिळाली नाही. आगामी विधानसभा निवडणुकीत प्रत्येक जिल्ह्यात किमान एक जागा तरी मिळेल की नाही. याबाबत स्पष्टता नाही. विधान परिषदेवरही विदर्भातून कोणालाही संधी दिली गेली. ज्याचा पक्ष संघटनेला फायदा होऊ शकतो, अशा व्यक्तीला विधान परिषदेवर संधी मिळायला हवी होती. केवळ पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या मागेपुढे फिरणाऱ्याला संधी देऊन काही उपयोग नाही. त्यामुळे विदर्भात संघटना वाढणार नाही. आमची पक्षावर नाराजी नाही. परंतु वरील विषयावर चर्चा होणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व जिल्हाध्यक्षांची बैठक बोलावण्यात आली, असे पक्षाचे नागपूर जिल्हाध्यक्ष बाबा गुजर म्हणाले.

हेही वाचा – महावितरणला थकबाकीचा ‘झटका’

संघटनेत राहून आरोप करत नाही, मात्र कुठल्याही मंत्र्यांकडे गेले तरी काम होत नाही असा सर्व जिल्हाध्यक्षांचा अनुभव आहे. याशिवाय जिल्हा नियोजन निधी, संघटनांचे विषय, राष्ट्रवादी कॉंग्रेसने याआधी विदर्भात ज्यांना संधी दिली त्यांचा फायदा संघटनेला झाला नाही. जिल्हा नियोजन समितीत अजित पवारांच्या पक्षाचे सदस्य पाठवलेले असतील तर त्यांना काहीच निधी मिळत नसेल तर संघटना चालवायची कशी, असा प्रश्नही बाबा गुजर यांनी उपस्थित केला. जिल्हाध्यक्षांच्या आजच्या बैठकीत जे ठराव संमत केले जातील. ते सर्व मुद्दे विदर्भातील नेते प्रफुल्ल पटेल आणि संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांची भेट घेऊन त्यांच्या समोर मांडले जातील, असेही ते म्हणाले.

Story img Loader