नागपूर: भंडा-या पाठोपाठ नागपुरातही कॉंगेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून फलक लागले असून त्यावर राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटल्या आहेत. खुद्द पटोले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निवडणुकीला अवधी असला तरी आणि मुख्यमंत्री होण्यासाठी संख्याबळ महत्वाचे असले तरी कार्यकर्त्यांना त्यांच्या नेत्यांना मुख्यमंत्री म्हणून पाहण्याची घाई झाली आहे. त्यामुळे ते नेत्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून फलक लावत आहे.
पहिले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अशा प्रकारचा फलक लागला, त्यानंतर अजित पवार, आदित्य ठाकरे आणि आता नाना पटोलेंचे फलक शहरात लागली. अजून निवडणुकीला वेळ आहे, त्यामुळे अशा प्रकारचे फलक कार्यकर्त्यांनी लावू नये, असे पटोले म्हणाले. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पटोलेंच्या फलकावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री होण्यासाठी संख्याबळ हवे असा टोला लगावला.