अधिवेशन काळात ८ ते १० अधिकारी निलंबित झाले आहे. त्यापैकी काही चांगले काम करणारे त्यांचे निलंबन दुर्दैवी आहे, असे विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले.अधिवेशनाच्या काळात आतापर्यंत ८ ते १० अधिकाऱ्यांचे निलंबन झाले आहे. त्यापैकी बहुतांश पोलीस आणि महसूल खात्यातील आहेत. पण यातील सर्वच अधिकारी दोषी नाही. त्यांची माहिती मी घेतली आहे. मी लोकशाहीची आयुधे वापरून हा प्रश्न उपस्थित करून संबंधिताला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करेल. यात कुठलेही राजकारण नाही.
सत्ताधारी- विरोधी पक्षाकडून नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न होतात. यावेळी कुणी अधिकारी लोकप्रतिनिधींशी जाणीवपूर्वक चुकीचे वागल्यास, त्यांचे अपमान केल्यास संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई केली जाते, असेही पवार म्हणाले.
हेही वाचा: मिहानमधील प्रकल्प बाहेर जाण्यास भाजप सरकार जबाबदार: नाना पटोले
उदय सामंत यांच्या डिग्री बाबत काय म्हणाले?
उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या बोगस डिग्रीचे प्रकरण पुढे आले आहे. यावर बोलताना अजित पवार म्हणाले की आमदार, मंत्री व्हायला संविधानाने, कायद्यातील नियमात जे सांगितले असते, ते बघायचे असते. बाकी डिग्री बोगस आहे की नाही, हे गौण असते. तसे उदय सावंत हे हुशार आहेत. त्यांच्या शिक्षण संस्था आहे. त्यांनी विद्यापीठ काढले आहे. त्यांच्यावर टिकाटिप्पणी करण्यावर माझा अधिकार नाही. १०- १० डिग्र्या असलेले कसे काम करतात आणि कमी शिकून असलेलेही कसे काम करतात. हे महत्वाचे असते. यावेळी त्यांनी कमी शिकलेले वसंतदादा पाटील यांनी आपल्या कार्यकाळात केलेल्या प्रभावी कामाचे उदाहरण दिले.
हेही वाचा: ‘२०२३ पर्यंत स्वतंत्र विदर्भ द्या अन्यथा…’
शासकीय विमानाने दुपारी १ वाजता अनिल देशमुख यांना भेटायला मुंबई जाणार
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचीसुटका होणार आहे. त्यांना भेटण्यासाठी अजित पवार,आणि दिलीप वळसे पाटील नागपूरहून आणि जयंत पाटील हे सांगलीहून मुंबईला पोहचणार आहेत.अनिल देशमुख यांना मुंबई बाहेर जाता येणार नसल्याचे न्यायालयाच्या निर्णयात म्हटले आहे.त्यांच्या वकीलांशी चर्चा करून ते लोकप्रतिनिधी असल्याने त्यांना लोकांची प्रश्न मांडण्यासाठी नागपूर अधिवेशनात आणता येईल का यासाठी न्यायालयात बाजू मांडून त्यांना अधिवेशनात उपस्थित राहता येईल काय? म्हणून प्रयत्न करण्याची विनंती केली आहे, असे अजित पवार म्हणाले.
मुंबई जाण्यासाठी शासनाने विमान उपलब्ध केले असल्याचेही अजित पवार म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला आज कामकाज सल्लागार समितीची बैठक घेण्याबाबत विचारले. मी अनिल देशमुख यांना भेटायला जायचे असल्याने उद्या बैठकीची विनंती केली. त्यावर मुख्यमंत्री यांनी मला लवकर बैठक घेऊन शासकीय विमान उपलब्ध करण्याबाबत सांगितले. हे विमान कुणी वापरावे हे शासन ठरवत असल्याचेही पवार म्हणाले.