लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर: आज( रविवारी) सायंकाळी नागपूरमध्ये होणा-या महाविकास आघाडीच्या सभेत कोण-कोण बोलणार याबाबत तर्कवितर्क लावले जात होते. विशेषता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार येणार किंवा नाही? भाषण करणार किंवा नाही अशी चर्चा सुरू झाली होती याला खुद्द अजित पवार यांनीच पूर्णविराम देत राष्ट्रवादीसह इतर पक्षाचे कोण नेते बोलणार याची संभाव्य नावे सांगितली

सभेसाठी पवार यांचे स. १०;३० ला नागपूरमध्ये आगमन झाले. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना वरील माहिती दिली. ते म्हणाले ठरल्याप्रमाणे प्रत्येक पक्षातर्फे एक स्थानिक आणि एक राज्य पातळीवरील अशा दोन नेत्यांची भाषणे होईल. राष्ट्रवादी तर्फे जयंत पाटील आणि अनिल देशमुख, कॉंग्रेसतर्फे नाना पटोले, सुनील केदार आणि ठाकरे गटाकडून उध्वव ठाकरे व स्थानिक नेते भाषणे करतील. मी संभाजीनगर सभेत भाषण केल्याने नागपूरमध्ये प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील बोलतील. अन्य पक्ष त्यांची नावे ठरवतील, असे अजित पवार यांनी सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar talk about who will speak in the mahavikas aghadi meeting cwb 76 mrj