राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभा अधिवेशनात नक्षलवाद्यांकडून आमदार धर्मराव बाबा आत्राम यांना मिळालेल्या धमकीचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना नक्षलवाद्यांनी केलेल्या एका अपहरणाच्या घटनेचा उल्लेख केला. तसेच नक्षलवाद्यांच्या धमक्यांना गांभीर्याने घ्यावं, अशी मागणी केली. ते सोमवारी (१९ डिसेंबर) विधानसभेच्या अधिवेशनात बोलत होते.

अजित पवार म्हणाले, “शरद पवार मुख्यमंत्री असताना तेव्हाही नक्षलवाद्यांनी बाबा आत्राम यांचं अपहरण केलं होतं. नंतर चर्चा करून त्यांना सोडलं होतं. बाबा आत्राम असो की कोणीही इतर लोकप्रतिनिधी असो, अशावेळी या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन सभागृहाच्या नेत्यांनी ताबडतोब आत्राम यांची सुरक्षा वाढवावी. त्यांना योग्य बंदोबस्त द्यावा.”

Sanjay Raut Criticizes Ajit Pawar From Sharad Pawar Mps
Sanjay Raut: ‘फुटणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे’, शरद पवार गटाचे खासदार अजित पवारांची साथ देणार? संजय राऊत संतापले
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
When Devendra Fadnavis becomes Chief Minister conspiracy is hatched to create communal tension says Amar Sable
“देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतात तेव्हा जातीय तणाव निर्माण करण्याचं षड्यंत्र…”- अमर साबळे
tula shikvin changalach dhada adhipati defends mother akshara feels helpless
भुवनेश्वरीचा डाव यशस्वी! अक्षरा घर सोडून जाणार? अधिपतीने धरले आईचे पाय; म्हणाला, “आमच्या आईसाहेब…”
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
justice shekhar yadav controversial statement
अन्वयार्थ : ‘सांविधानिक भावना दुखावण्या’पल्याड…
Bajrang Sonwane meets Amit Shah
“बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सीआयडी चौकशी व्हावी”; शरद पवारांचा खासदार थेट अमित शाहांना भेटला
Gulabrao Deokar, Gulabrao Deokar latest news,
गुलाबराव देवकर यांच्या पक्ष प्रवेशास अजित पवार गटाच्या स्थानिक नेत्यांचा विरोध, पक्ष प्रवेशाच्या विरोधात फलक झळकला

“…तर प्रशासनाचाही विश्वास उडेल”

“केवळ आत्राम नाही, तर प्रशासनालाही सुरक्षा द्यावी. प्रशासनाला वाऱ्यावर सोडलं जातं असं वाटलं तर त्यांचाही विश्वास उडेल. तसंही होता कामा नये. राज्य सरकारने कठोरातील कठोर भूमिका घेतली पाहिजे,” अशी मागणी अजित पवार यांनी केली.

“नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा लोकशाहीला आव्हान दिलं”

अजित पवार आमदार धर्मराव बाबा आत्राम यांना नुकतीच मिळालेल्या धमकीवर म्हणाले, “सभागृहातील सर्व सदस्यांचे संरक्षण करणे, त्यांची सुरक्षेबाबत काही अडचण असेल तर त्यात लक्ष देऊन निर्देश देणं हा सभागृह अध्यक्षांचा अधिकार आहे. नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा लोकशाहीला आव्हान दिलं आहे. गडचिरोलीचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्यासह प्रशासनाला थेट धमकी देण्यात आली आहे.”

“आमदार आत्राम यांच्यासह प्रशासनाला धमकी”

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गडचिरोलीचे पालकमंत्री असताना त्यांनाही नक्षलवाद्यांकडून अशाप्रकारे धमकीचे पत्र आले होते. भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या (माओवादी) पश्चिम झोन कमिटीचा सदस्य असलेल्या श्रीनिवास नावाच्या नक्षलवाद्याने थेट प्रेस नोट काढली आहे. त्यात आमदार आत्राम यांच्यासह प्रशासनाला धमकी दिली,” अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

हेही वाचा : “निदान आमदारांची गाडी तरी सोडा ना ओ”, छगन भुजबळांकडून अधिवेशनात तीव्र नाराजी, म्हणाले…

“नक्षलवाद आणि प्रशासन वाद पुन्हा उफाळला”

अजित पवार पुढे म्हणाले, “गडचिरोली तसा मागास आदिवासी जिल्हा आहे. तिथं सुरजागड येथे लोह-खनिज प्रकल्पावरून नक्षलवाद आणि प्रशासन असा वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. आता नक्षलवाद्यांकडून तेथील लोकप्रतिनिधींना धमक्या मिळत आहेत. त्यामुळे खळबळ उडाली आहे. सुरजागडला मागील पाच वर्षांपासून हा प्रकल्प सुरू आहे. त्याला स्थानिक प्रतिनिधींकडून नेहमीच विरोध होत आहे. मधल्या काळात ८० वाहनांची जाळपोळ झाली आहे.”

Story img Loader