वर्धा: सेवाग्राम आश्रम देश विदेशातील पर्यटक तसेच गांधी अभ्यासकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. मात्र या परिसरातील एक वास्तू तब्बल दीड महिने बंद ठेवण्यात आली होती. ती आता खुली करण्यात आली आहे.
या आखरी निवासचे खास ऐतिहासिक मूल्य आहे. या निवासात महात्मा गांधी सहा महिने राहले होते. २५ ऑगस्ट १९४६ ला गांधीजींनी याच निवासातून दिल्लीला प्रयाण केले होते ते परत न येण्यासाठी. म्हणून हा आखरी निवास ओळखला जातो. १९३६ साली गांधीजीनी आश्रमाची स्थापना केली होती. येथे बापू कुटी व अन्य निवास आहेत.
हेही वाचा… ५३ हजार १३६ कुटुंबांना मिळाला हक्काचा निवारा
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर इथल्या काही आश्रमाची दुरुस्ती केल्या जाते.आखरी निवासला पारंपरिक पद्धतीनेच डागडुजी केल्या जाते. माती, कुड, फाटे, बांबू, बोऱ्या, कवेलू असे साहित्य वापरल्या जात असते. अत्यंत काळजीपूर्वक त्याचे जतन होत आहे. हे संपूर्ण कार्य आश्रमातील शंकर वाणी, रामभाऊ काळे, जानराव काळे, नामदेव बघेकर, सुनील फोकमारे, नथू झोरे, सुधाकर खडतकर, जयश्री पाटील आदी सहकाऱ्यांनी पूर्ण केले. चार दिवसांपूर्वी आलेल्या राज्यपाल रमेश बैस यांनीही आखरी निवासला भेट देत इतिहास समजून घेतला होता.