साहित्य संमेलनाची कार्यक्रम पत्रिका जाहीर; लेखिका नयनतारा सहगल यांच्या हस्ते उद्घाटन
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ , डॉ. वि.भि. कोलते केंद्र व वाचनालय आणि यवतमाळच्या विदर्भ साहित्य संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ११ ते १३ जानेवारी दरम्यान यवतमाळमध्ये आयोजित ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. परिसंवाद, चर्चासत्र, कवीकट्टा, निमंत्रितांचे कविसंमेलन, वऱ्हाडी बोली कविसंमेलन, परिसंवाद, प्रकट मुलाखतीद्वारे सलग तीन दिवस मायमराठीचा जागर येथे होणार आहे.
११ जानेवारीला दुपारी ४ वाजता ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होईल. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पूर्वाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, संमेलनाध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे, सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. त्यापूर्वी सकाळी ९.३० वाजता ध्वजारोहण आणि लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन होईल. साहित्य संमेलन परिसराला शायर भाऊसाहेब पाटणकर परिसर आणि प्राचार्य राम शेवाळकर व्यासपीठ नाव देण्यात आले आहे. सायंकाळी ७ वाजता संमेलनाध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे यांच्या हस्ते कवी कट्टाचे उद्घाटन होईल. त्यानंतर सायंकाळी ७.३० वाजता भाऊसाहेब पाटणकर परिसरात फ.म. शहाजिंदे यांच्या अध्यक्षतेत कविसंमेलन होणार आहे. त्यात नवोदित आणि प्रस्थापित कवी कविता सादर करतील.
१२ जानेवारीला सकाळी ग.दि. माडगूळकर यांच्या साहित्य संपदेचा वेध घेणारा संगीतमय कार्यक्रम ‘गदिमायन’ सादर होईल. समन्वयक डॉ. वंदना बोकील – कुळकर्णी, सहभाग- अपर्णा केळकर आणि काव्यवाचन अक्षय वाटवे आणि गौरी देशपांडे करतील. सकाळी ११ वाजता विद्या बाळ आणि भ.मा. परसवाळे या मान्यवरांचा सत्कार करण्यात येईल. दुपारी १२ वाजता डॉ. शरद निंबाळकर यांच्या अध्यक्षतेत ‘कृषक समाजाच्या चित्रणाबाबत नागरी लेखक उदासीन का’ या विषयावर परिसंवाद होईल.
दुपारी २ वाजता ‘माध्यमांची स्वायत्ता: नेमकी कोणाची’ या विषयावर चर्चासत्र होणार आहे. त्यात ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर, नितीन केळकर, ज्ञानेश महाराव व प्रा. जयदेव डोळे विचार व्यक्त करणार आहेत. संजय आवटे समन्वयक राहतील. हे सर्व कार्यक्रम समता मैदान येथील भाऊसाहेब पाटणकर परिसरात होतील.
डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात दुपारी १२ वाजता डॉ. विद्यासागर पाटणकर यांच्या अध्यक्षतेत ‘सत्वशील समाज घडणीसाठी आज महानुभाव वारकरी आणि बसवेश्वर विचाराची गरज’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. त्यात डॉ. मरतड कुळकर्णी, डॉ. महेश गायकवाड, विजयराज बोधनकर, डॉ. गुरुप्रसाद पाखमोडे आणि डॉ. अशोक राणा सहभागी होतील. दुपारी २ वाजता ‘ललित गद्य, ललित गद्यकार , ललित गद्यानुभव’ या विषयावर मधुकर धर्मापुरीकर, भारत सासणे, वर्षां गजेंद्रगडेकर, डॉ. श्रीकांत तिडके भाष्य करतील. सायंकाळी ५ वाजता मीरा ठाकरे यांच्या अध्यक्षतेत वऱ्हाडी बोली कविसंमेलन होणार आहे.
सायंकाळी ७ वाजता महाराष्ट्राचे काव्यवैभव- चंदनाच्या विठोबाची माय गावा गेली या काव्यसंमेलनात विदर्भ व मराठवाडय़ातील नामवंत कवी कविता सादर करतील.
१३ जानेवारीला भाऊसाहेब पाटणकर परिसरात सकाळी ९.३० वाजता मान्यवर कवींचे काव्यवाचन होईल. त्यानंतर सकाळी ११.३० वाजता प्रा. प्र.ना. पराजंपे यांच्या अध्यक्षतेत ‘साहित्यकेंद्र अभ्यासक्रमामुळे भाषा शिक्षणाची दुरवस्था’ या विषयावर परिसंवाद होईल. त्यात डॉ. प्रकाश परब, डॉ. रामचंद्र काळुंखे,डॉ. दिलीप धोंडगे, डॉ. काशिनाथ बऱ्हाटे, प्रसाद देशपांडे, प्राचार्य रमेश जलतारे प्रा. विनायक बापट विचार व्यक्त करतील. दुपारी १.१५ वाजता डॉ. विजय भटकर, माधव गाडगीळ, चंद्रकात कुळकर्णी, डॉ. राणी बंग या चार महत्त्वपूर्ण प्रतिभावंतासोबत चर्चा, गप्पा, बातचीत कार्यक्रम होईल. राजीव खांडेकर कार्यक्रमाचे संचालन करतील.
दुपारी २ वाजता डॉ. प्रभा गणोरकर यांची प्रगट मुलाखत होईल. मंगेश काळे आणि डॉ. कविता मुरुमकर मुलाखत घेतील.
डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात सकाळी ९.३० वाजता डॉ. रेखा इनामदार यांच्या अध्यक्षतेत ‘मराठी समीक्षेची समीक्षा’ या विषयावर परिसंवाद होईल. त्यात डॉ. गणेश मोहिते, डॉ. धनश्री साने, प्रा. रमेश अंधारे, डॉ. सुहासिनी कीर्तीकर, डॉ. मनोज तायडे, डॉ. केशव देशमुख विचार व्यक्त करतील.
सकाळी ११.३० वाजता ‘नव तंत्र ज्ञानाधारीत साहित्याच्या नव्या वाटा’ याविषयावर चर्चा होईल. या चर्चेत अतुल कहाते, बालाजी सुतार, डॉ. जयंत कुळकर्णी, डॉ. अजय देशपांडे, श्रीकांत बोजेवार, मोहिनी मोडक, प्रा. क्षितिज पाटुकले बोलतील.
दुपारी १.४५ वाजता कथा आणि व्यथा- तांडांच्या आणि पोडांच्या या विषयावर माजी मंत्री प्रा. वसंत पुरके, प्रकाश राठोड, गणेश चव्हाण, रवींद्र कोकरे, डॉ. वसंत राठोड, भाऊसाहेब राठोड, प्रकाश घोटेकर, प्रा. विजय राठोड भाष्य करणार आहेत.
समारोपाला नितीन गडकरी</strong>
१३ जानेवारीला दुपारी ४.३० वाजता खुले अधिवेशन आणि समारोप होईल. संमेलनाध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे यांच्या उपस्थित होणाऱ्या समारोपीय कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर उपस्थित राहतील. यावेळी ठराव वाचन आणि सदाशिवराव ठाकरे व सुभाष शर्मा यांचा सत्कार होईल. सायंकाळी ७ वाजता आकाशवाणी यवतमाळ प्रस्तुत सांस्कृतिक कार्यक्रम होईल. त्यात प्रमोद बावीस्कर, मंगला माळवे, जयंत शेटे, अतुल सारडे, शीतल देशमुख सहभागी होतील.