नागपूर : दिल्ली येथे आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान मोदी यांना अधिकृतरित्या निमंत्रित करण्यात आले आहे. पंतप्रधानांनी हे निमंत्रण स्वीकारले तर सुरक्षेच्या दृष्टीने संमेलनाचे उद्घाटन मोजक्या लोकांच्या उपस्थितीत विज्ञान भवनात करायचे नियोजन आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
३ ऑक्टोबर रोजी केंद्र सरकारने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला. या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांना संमेलनाच्या उद्घाटनासाठी बोलवावे, शरद पवार स्वागताध्यक्ष असतील तर संमेलनाच्या मंचावर ‘राजकीय संतुलन’ साधण्यासाठी उद्घाटक म्हणून पंतप्रधानच हवेत, अशी एक मागणी पुढे आली होती. साहित्य महामंडळाचीही अशीच इच्छा होती. अखेर या इच्छेची ‘दखल’ घेत संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधानांना पत्र पाठवून संमेलनाच्या उद्घाटनासाठी निमंत्रित केले आहे.
हेही वाचा : गडचिरोली : अबुझमाडमध्ये जवान व नक्षल्यांमध्ये जोरदार चकमक; सात नक्षल्यांना कंठस्नान
पंतप्रधानांनी हे निमंत्रण स्वीकारले की कसे, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. परंतु, पंतप्रधान येणार असतील तर सुरक्षा व्यवस्थेमुळे संमेलनस्थळी निर्माण होणारे प्रश्न व संमेलनाच्या मंचावर महामंडळाच्या शिष्टाचारानुसार बैठक व्यवस्थेत करावे लागणारे बदल, या सर्व बाबी लक्षात घेता संमेलनाचे उद्घाटन विज्ञान भवनात करायचे, त्याचे थेट प्रसारण तालकटोरा मैदानात संमेलनस्थळी करायचे, असा पर्याय आयोजकांनी सुचवला आहे.
पंडित नेहरू प्रत्यक्ष संमेलनाला आल्याची नोंद
यापूर्वी १९५४ मध्ये दिल्लीत झालेल्या साहित्य संमेलनाचे उद्घाटन तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते झाले होते. स्वागताध्यक्षपदी असलेले तत्कालीन केंद्रीय मंत्री काकासाहेब गाडगीळ व तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या संमेलनाला नेहरूंनी संबोधितही केले होते.
हेही वाचा : लोकसत्ता लोकांकिका : ‘पासपोर्ट’ महाअंतिम फेरीत, नागपूर विभागीय अंतिम फेरी जल्लोषात
स्थळ बदलावरून वादाची शक्यता
साहित्य संमेलनाबाबत कितीही वादप्रवाद असले तरी दरवर्षी संमेलनाला येणाऱ्या साहित्यप्रेमींची संख्या वाढतच आहे. संमेलनातील इतर सत्रांसोबतच भव्य स्वरूपात होणाऱ्या उद्घाटनाचेही साहित्यप्रेमींना आकर्षण असते. कारण, उद्घाटक व अध्यक्षांना थेट ऐकता येते. परंतु, दिल्लीतील संमेलनाचे उद्घाटन परस्पर दुसऱ्याच ठिकाणी उरकले जाणार असेल तर या निर्णयाला साहित्यप्रेमींकडून विरोध होऊ शकतो, अशी साहित्य वर्तुळात चर्चा आहे.