अकोला : जन्मदात्या वडिलांनाच नराधम मुलाने जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील लोटणापूर येथे घडला. दारू पिऊन आलेल्या मुलाने खाटेवर आजारी असलेल्या वडिलांशी वाद घातला. रागाच्या भरात आजारी वडिलांनाच आग लावली. अर्धांगवायूच्या झटक्यामुळे आजारी वडील स्वत:चा बचाव करू शकले नाही. गंभीररित्या भाजल्या गेलेल्या वडिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी बाळापूर पोलिसांनी बुधवारी आरोपी मुलावर हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

कलंकित मुलाची घटना बाळापूर तालुक्यातून समोर आली. आपल्या जन्मदात्या आजारी वडिलांविषयी कुठलीही सहानुभूती न बाळगता नराधम मुलाने त्यांना जिवंत जाळले. धनेगाव येथील अजाबराव बापूसा इंगळे (५५) हे पत्नी व तीन मुलांसह मोलमजुरी करून लोटणापूरमध्ये भाड्याच्या खोलीत राहत होते. काही दिवसांपूर्वी अजाबराव यांना अर्धांगवायूचा झटका आला. त्यामुळे ते गंभीर आजारी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू होते. घरात ते खाटेवरच पडून राहत होते. १४ जुलै रोजी दुपारी त्यांचा दुसऱ्या क्रमांकाचा मुलगा आकाश अजाबराव इंगळे (३०) हा घरात दारू पिऊन आला. आजारी वडिलांसोबत व्यसनाधीन मुलाचा वाद झाला. दोघांमधील वाद टोकाला गेला. व्यसनाधीन मुलाने रागाच्या भरात घरातील पेटलेल्या चुलीतील आग आजारी वडिलांच्या खाटेला खालून लावली. वडिलांना त्या आगीच्या झळांमध्ये सोडून देत तो घरातून निघून गेला. खाटेवरील कपड्यांमुळे आग भडकली. आजारपणामुळे शरीराची हालचाल करता येत नव्हती. त्यातच मदतीसाठी घरात कुणीच नसल्याने ते आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. या आगीमध्ये ते गंभीररित्या भाजल्या गेले.

Two youths attacked with a koyta in Khadki crime news Pune news
पुणे: खडकीत दोघा तरुणांवर कोयत्याने वार
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
nana patole
पैशाच्या जोरावर लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न म्हणजेच ‘ऑपरेशन लोटस’,पटोलेंचा घणाघात
Sexual assault on three year old girl in Ghatanji Yavatmal crime news
यवतमाळ: संतापजनक! तीन वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार
Atul Subhash
“मर्द को भी दर्द होता है!” आत्महत्येआधीचा अतुलचा तासभराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; पत्नी आणि सासरच्यांवर गंभीर आरोप
account wise inquiry started against clerk in case of corruption in Jijamata Hospital of Municipal Corporation in Pimpri
पिंपरी : जिजामाता रुग्णालयातील रकमेचा अपहार; लिपिकाची खातेनिहाय चौकशी
young woman abandoned her newborn near Vanzra Layout Nagpur
अनैतिक संबंधातून जन्मलेल्या बाळाला रस्त्यावर फेकले
Vasai-Virar City Municipal Corporation
प्रभारी आयुक्त रमेश मनाळे यांची समाजमाध्यमावर बदनामी

हेही वाचा – गोंदिया : सिंगलटोली संकुलात एका व्यक्तीवर धारदार शस्त्राने हल्ला

हेही वाचा – गोंदिया : स्कुलबस व दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू, महिला गंभीर

ही घटना उघडकीस येताच गंभीर भाजलेल्या वडिलांना उपचारार्थ अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याची शहर कोतवाली पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास बाळापूर पोलिसांकडे वर्ग केला. तपासादरम्यान व्यसनाधीन मुलानेच वडिलांना जाळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. बाळापूर पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा केला. या प्रकरणी तिन्ही मुलांची कसून चौकशी करण्यात आली. यामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा मुलगा आकाश याच्याविरुद्ध त्याचाच लहान भाऊ गौरव अजाबराव इंगळे (२४) याने फिर्याद दाखल केली. त्यानंतर सर्व प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी आकाश इंगळे याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. नराधम मुलाने वडिलांसोबत केलेल्या गैरकृत्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

Story img Loader