अकोला : भारतीय जनता पक्षाची जम्बो महानगर व जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. विविध समाज घटकांचा कार्यकारिणीत समावेश करून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर समतोल राखण्याचा प्रयत्न भाजपाने केला आहे.
भाजपाच्या जिल्हा व महानगर कार्यकारिणीची प्रतीक्षा लागली होती. अखेर भाजपा जिल्हाध्यक्ष किशोर मांगटे पाटील यांनी जिल्हा, तर महानगराध्यक्ष जयंत मसने यांनी महानगर कार्यकारिणी जाहीर केली. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार संजय धोत्रे, प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर, संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, आमदार हरीश पिंपळे, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार वसंत खंडेलवाल, विजय अग्रवाल, तेजराव थोरात यांच्या मार्गदर्शनात त्यांच्याशी चर्चा करून कार्यकारिणीचे गठण केले.
हेही वाचा – कडू स्पष्टच म्हणाले, तुमच्या मुख्यमंत्रीपदाला काही अर्थ नाही, कूछ भी नही बदला
जिल्हा कार्यकारिणीमध्ये ९२ जणांचा समावेश असून त्यात आदिवासी, ओबीसी, महिला, डॉक्टर, १८ पगड जाती, १२ बलुतेदार यांचा समावेश आहे. त्यात चार सरचिटणीस, दहा उपाध्यक्ष, दहा सचिव आहेत. महानगर कार्यकारिणीमध्ये चार सरचिटणीस, दहा उपाध्यक्ष व ६४ कार्यकारणी सदस्यांची निवड केली.