अकोला : प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने सिकंदराबाद ते भावनगर टर्मिनस दरम्यान विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ही गाडी अकोलामार्गे धावणार असून त्याच्या आठ फेऱ्या होणार आहे.

विशेष गाडी क्रमांक ०७०६१ सिकंदराबाद ते भावनगर टर्मिनस सिकंदराबाद येथून १९ जुलै ते ९ ऑगस्टपर्यंत दर शुक्रवारी रात्री ८ वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी पहाटे ५.५५ वाजता भावनगर टर्मिनस येथे पोहोचेल. विशेष गाडी क्रमांक ०७०६२ भावनगर टर्मिनस येथून २१ जुलै ते ११ ऑगस्टपर्यंत दर रविवारी सकाळी १०.१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी ३.४५ वाजता सिकंदराबाद येथे पोहोचेल. या गाडीच्या चार फेऱ्या होणार आहेत.

London–Calcutta bus service
London–Calcutta bus service: लंडन ते कलकत्ता, सर्वाधिक लांबीचा बससेवा मार्ग; कुणी चालवली ही बससेवा? कुणासाठी?
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?
maharashtra assembly election 2024 traffic diversions in pune city on occasion of pm modi visit
पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त शहरात वाहतूक बदल; स. प. महाविद्यालय परिसरातील रस्ते वाहतुकीस बंद
Matheran Mini Toy Train , Mini Train Vistadome Coach,
माथेरानच्या राणीचा ‘विस्टाडोम’विनाच प्रवास
mumbai lhb coaches train
कोकण मार्गावरील एक्सप्रेसला जोडले जाणार एलएचबी डबे, प्रवाशांच्या सुरक्षेत होणार भर
nashik vidhan sabha
नाशिक परिक्षेत्रात २५ दिवसांत ५० कोटींचा मुद्देमाल जप्त, १७ हजार गुन्हेगारांविरुध्द कारवाई
Haryana for atm robbery pune
पुणे: एटीएम फोडून रोकड चोरणारी हरयाणातील टोळी गजाआड, स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलिसांची कामगिरी

हेही वाचा – ashadhi ekadashi 2024 : ‘शेगावी आलो तुझ्या दर्शनाला…’, आषाढीनिमित्त संतनगरी फुलली

या विशेष गाडीला मेडचल, कामारेड्डी, निजामाबाद, बासर, मुदखेड, नांदेड, पूर्णा, बसमत, हिंगोली डेक्कन, वाशिम, अकोला, भुसावळ, नंदुरबार, सुरत, वरोदरा, अहमदाबाद, विरंगम, सुरेंद्रनगर, बोटाड, ढोला, सोनगढ, सिहोर आदी स्थानकावर थांबा राहणार आहे. एक प्रथम वातानुकूलित, दोन वातानुकूलित द्वितीय, तीन वातानुकूलित तृतीय, १२ शयनयान, चार द्वितीय श्रेणीसह दोन लगेज कम गार्डच्या ब्रेक व्हॅन असे एकूण २४ डब्ब्यांची गाडीची संरचना राहणार आहे. या विशेष रेल्वे सेवांचा प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

अकोल्यात एक दिवस पाणीपुरवठा बंद, वाचा कारण काय?

केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियानांतर्गत जलशुद्धीकरण केंद्र महान येथे सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे अकोला शहरातील पाणीपुरवठा एक दिवस उशिराने होणार आहे.

हेही वाचा – वर्धा : कारवाईची नोटीस! नामवंत इंग्रजी शाळा ठरणार अनधिकृत

शासन निर्णयानुसार महाऊर्जा विभागामार्फत नियुक्त केलेल्या मे.भारत इलेक्ट्रॉनिक्स बंगळुरू यांच्या मार्फत अंतिम टप्प्यात काम सुरू आहे. महाऊर्जा विभागाने मागणी केल्यानुसार महावितरणचे उच्चदाब वीजकेंद्र महान येथील टर्मिनल जोडणी व जलशुद्धीकरण केंद्र महान येथील पॅनल, वीज उपकेंद्र, इन्व्हर्टर, मिटर जोडणी करण्यासाठी उच्च दाब वीज पुरवठा तात्पुरता बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे १८ जुलै रोजी संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा बंद राहील. त्यामुळे शहर पाणीपुरवठा वेळापत्रकात तात्पुरता बदल होऊन संपूर्ण शहराला एक दिवस उशिराने पाणी पुरवठा करण्यात येईल.

३०० क्विंटल तुरीची चोरी, ५१ लाखाच्या मुद्देमालासह आरोपी गजाआड

एमआयडीसीतून चोरी गेलेल्या ३०० क्विंटल तुरीचा गुन्हा उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले आहे. याप्रकरणी चार आरोपींना अटक करुन ५१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अब्दुल फारुख अब्दुल खालीद (५५), त्याचा मुलगा गुलाम ख्वाजा मोहम्मद फारूख (२५) दोन्ही रा. पोळा चौक कल्याण वाडी, जुनेशहर अकोला, आरिफ अब्दुल कय्युम (५५) रा. मासुम शाह दर्गा, शिवाजी वसंतराव थोरात (३५) धंदा अडत रा. चिखलगाव ता. जि. अकोला ह.मु. नरेंद्र नगर, डाबकी रोड अकोला अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.