लोकसत्ता टीम

अकोला : अकोला मतदारासंघात लोकसभा निवडणुकीतील प्रचार शिगेला पोहोचला आहे. जाहीर प्रचारासाठी शेवटचा काही तासांचा कालावधी शिल्लक असून मतदारांपर्यंत पोहोचण्याची उमेदवारांमध्ये चढाओढ लागली आहे. तुल्यबळ तिरंगी लढतीमुळे निवडणुकीत चांगलीच रंगत आल्याचे चित्र आहे.

j k assembly elections after 10 year likely to repeat ls 2024 turnout
Jammu And Kashmir Assembly Polls : जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा रांगा लागतील!
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
election Akola, festival Akola, Akola latest news
अकोल्यात उत्सवातून निवडणुकीची तयारी
hm amit shah instructions to distribute seats according to ability to win assembly elections
जिंकून येण्याच्या क्षमतेनुसारच जागावाटप; अमित शहा यांनी महायुतीच्या नेत्यांना बजावले
possibilities of BJP lose five seats in Marathwada because of ajit pawar NCP
मराठवाड्यात भाजपच्या वाट्याच्या पाच जागा कमी होण्याची शक्यता
MPSC Exam Loss of two lakh candidates for five thousand students
MPSC Exam : एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयाला विरोध का होत आहे?
mira Bhayandar , BJP, Narendra Mehta, assembly elections, Mira Road, internal disputes, Gita Jain, Ravi Vyas, election candidacy, former MLA, BJP workers, mira bhayandar news,
नरेंद्र मेहता आगामी निवडणुकीचे उमेदवार, भाजप कार्यकर्ता मेळाव्यात घोषणा; अंतर्गत वाद पेटून उठण्याची शक्यता
Jharkhand Mukti Morcha leader and former Chief Minister Champai Soren hints at quitting the party
चंपई सोरेन लवकरच भाजपमध्ये? अचानक दिल्लीत दाखल झाल्याने चर्चांना उधाण

अकोला लोकसभा मतदारसंघात शेवटच्या टप्प्यात प्रचार मोहिमेने जोर पकडला. १५ उमेदवार निवडणूक रिंगणात असून परंपरेनुसार तिहेरी लढत आहे. भाजपचे अनुप धोत्रे, काँग्रेसचे डॉ. अभय पाटील व वंचित आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये अटीतटीचा सामना दिसून येतो. गेल्या दोन निवडणुकांमध्ये धार्मिक रंग चढल्याने भाजपने एकतर्फी बाजी मारली. यंदा दोन प्रमुख उमेदवार मराठा समाजाचे असल्याने मोठ्या प्रमाणावर मतविभाजन होणार असल्याचे निश्चित आहे. जातीय राजकारण व मविभाजनावर निवडणुकीतील विजयाचे गणित जुळून येईल. हे समीकरण जुळवून आणण्यासाठी उमेदवारांची धडपड सुरू आहे. मतदारसंघातील अनेक मुद्द्यावर ऊहापोह केला जात असून निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय चर्चाचे फड रंगले आहेत.

आणखी वाचा-भाजपच्या बालेकिल्यातच शिंदे सेनेची दमछाक, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वाशीममध्ये बाईक रॅली

तिन्ही उमेदवारांकडून जोरदार प्रचार मोहीम राबविण्यात आली. पहिल्या टप्प्यात प्रमुख उमेदवारांकडून मतदारांच्या भेटीगाठी, मेळावे, कॉर्नर सभा, बैठका घेतल्यानंतर शेवटच्या टप्प्यात जाहीर सभांवर भर दिला जात आहे. भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे यांच्या प्रचारासाठी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजप नेत्यांनी जाहीर सभा घेऊन मतदारांना साद घातली. काँग्रेस उमेदवार डॉ. पाटील यांच्या प्रचारासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस मुकुल वासनिक, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रचारसभा घेऊन मदतारांना साकडे घातले आहे. ॲड. आंबेडकर प्रचार सभांच्या माध्यमातून मतप्रेरणी करीत आहेत. त्यांच्या प्रचारार्थ प्रा. अंजली आंबेडकर, सुजात आंबेडकर यांच्यासह वंचितचे पदाधिकारी व कार्यकर्ते मतदारसंघ पिंजून काढत आहेत. प्रचार यंत्रणेला यावेळेस आधुनिकतेची जोड मिळाल्याचे दिसून येते. समाजमाध्यमांतून देखील प्रचारयुद्ध चांगलेच पेटले. आता मतदार कुठल्या उमेदवारांच्या प्रचाराला प्रभावित होतो व कुणाच्या पारड्यात आपला कौल टाकतो, हे येणारा काळच स्पष्ट करू शकेल.

आणखी वाचा-लग्नाचे निमित्त झाले अन्… पतीने कुऱ्हाडीने सपासप वार करून पत्नी व मुलीला संपवले

अंतर्गत मोर्चेबांधणीचा जोर

जाहीर सभांमधून मतदारांमध्ये प्रचार करण्यासोबतच छुप्या व अंतर्गत मोर्चेबांधणीवर देखील तिन्ही उमेदवारांसह राजकीय पक्षांनी जोर दिला आहे. समाजाचे नेते, विविध घटकांचे प्रमुख यांच्या बैठका घेऊन गठ्ठा मतदान आपल्याकडे वळवण्याचे प्रयत्न उमेदवारांकडून सुरू आहेत. मतदारसंघात मतविभाजन निर्णायक ठरण्याची चिन्हे आहेत.