अकोला : कृषी क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. अकोला जिल्ह्यात तंत्रज्ञानस्नेही शेतकऱ्याने पेरणीचा नवा प्रयोग केला. ‘जीपीएस कनेक्ट’ या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून विनाचालक ट्रॅक्टरद्वारे सोयाबीनची पेरणी करण्यात आली. जर्मन तंत्रज्ञानाचा महाराष्ट्रात पहिल्यांदाच वापर होत असल्याचा दावा राजू वरोकार यांनी केला. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एका रेषेत सरळ पेरणी होत असल्याने शेतकऱ्यांसाठी सोयीस्कर ठरत असल्याचे ते म्हणाले.

शेती विकसित करण्यासाठी हजारो वर्षांपासून विविध प्रयोग करण्यात आलेत. त्यातून कृषी क्षेत्रात व्यापक बदल घडत असले तरी शेतकऱ्यांना आजही अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यात अनियमित पाऊसमान व हवामानातील बदल, त्याचे शेतीवर होणारे दुष्परिणाम, भांडवलाची, शेतमजुराची कमतरता, तंत्रज्ञानाचा अभाव आणि सर्व जुळून चांगले पीक आल्यावरही बाजारपेठेची शाश्‍वती नाही, अशा अनेक अडचणी आजही शेतकऱ्यांसमोर आहेत. कृषी क्षेत्राला परंपरेसोबतच आधुनिकतेची जोड दिली जाणे काळाची गरज आहे.

London–Calcutta bus service
London–Calcutta bus service: लंडन ते कलकत्ता, सर्वाधिक लांबीचा बससेवा मार्ग; कुणी चालवली ही बससेवा? कुणासाठी?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Bluetooth 6.0 introduces channel sounding
Bluetooth 6.0 लेटेस्ट व्हर्जन, ऑडिओ, व्हिडीओ ते डॉक्युमेंट्स शेअर करण्याची असणार सोय; कोणत्या फोन, डिव्हाईसमध्ये चालेल?
Eurasian Water Cat Pune District, Indapur,
पुणे जिल्ह्यात प्रथमच दुर्मीळ ‘युरेशियन पाणमांजरा’चा शोध, इंदापूरमधील विहिरीमध्ये पडलेल्या पाणमांजराची सुटका
Traffic congestion on Mumbai Ahmedabad National Highway due to lack of planning
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर नियोजनाअभावी वाहतूक कोंडी, तासंतास अडकून पडल्याने प्रवाशांचे हाल
kharghar to turbhe link road work will start after maharashtra assembly election 2024
खारघर तूर्भे लिंकरोडचे काम निवडणूकीनंतर सूरु होणार
Dnyanradha Multi State Co Operative Credit Society, fraud case, ED
ईडीकडून ३३३ कोटींच्या मालमत्तेवर टाच
cash seized south mumbai ahead of assembly elections in maharashtra
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबईत कारवाई ; सव्वा दोन कोटींची रोख जप्त

हेही वाचा…सावधान! प्राप्तिकर विभागाचे बनावट नियुक्तीपत्र, १४.५० लाखांची फसवणूक

दररोज नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत असून शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी ते उपलब्ध करून दिले जातात. कृषी विद्यापीठाद्वारे देखील संशोधनावर भर दिला जातो. अकोला जिल्ह्यातील उमरी येथील राजू वरोकार यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे शेतामध्ये सोयाबीन पेरणीचा अनोखा प्रयोग केला. या प्रयोगाची चित्रफित समाज माध्यमांवर चांगलीच प्रसारित होत आहे.

‘जीपीएस कनेक्ट’ सॉफ्टवेअरच्या माध्यमातून चालकाविना चालणाऱ्या ट्रॅक्टरद्वारे शेतामध्ये सोयाबीनची पेरणी करण्यात आली. महाराष्ट्रातील हा पहिलाच प्रयोग असल्याचा दावा त्यांनी केला आहे. शेतात ट्रॅक्टरद्वारे पेरणी करण्यासाठी चालकाची गरज नाही. पेरणी अगदी सरळ होते. यासाठी जर्मन तंत्रज्ञानाचे उपकरण लावण्यात आले आहे. हे उपकरण शेताच्या एका बाजूला ठेवावे लागते. ‘जीपीएस कनेक्ट’द्वारे ते उपकरण ट्रॅक्टरशी जोडले जाते. त्यावरून विनाचालक ट्रॅक्टरचे संपूर्ण नियंत्रण होते. सरळ रेषेमध्ये ट्रॅक्टर स्वतःहून पेरणी करतो, असे राजू वरोकार यांनी सांगितले.

हेही वाचा…गडचिरोलीतील नक्षलवादी चळवळीला हादरा, जहाल नक्षलवादी नेता गिरीधर याचे पत्नीसह आत्मसमर्पण

पेरणीनंतर शेतात उगवलेल्या पिकामध्ये मशागत करताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अकोल्यातील शेतकरी मुकेश वरोकार यांच्या शेतात जर्मन तंत्रज्ञानाद्वारे विनाचालक ट्रॅक्टरच्या माध्यमातून केलेल्या पेरणीमुळे शेतकऱ्यांचा पेरणीनंतरची अडचण दूर होईल, असे राजू वरोकार म्हणाले. या आधुनिक तंत्रज्ञानाची अकोला जिल्ह्यात चांगली चर्चा आहे.

हेही वाचा…निवडणूकीत काय ‘ताल’ झाला हे सर्वांसमोर विचारा; निरीक्षक आ. प्रवीण दटकेंवर आ. दादाराव केचे संतापले

शेतकऱ्यांमध्ये कुतूहल

जर्मन तंत्रज्ञानाच्या आधारे विनाचालक ट्रॅक्टरद्वारे पेरणी करण्याच्या प्रयोगाचे शेतकऱ्यांमध्ये विशेष कुतूहल दिसून येत आहे. समाजमाध्यमातील शेतकरी वर्गाच्या विविध समुहांवर या प्रयोगाची चित्रफित चांगलीच प्रसारित झाली आहे.