लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अकोला : शिक्षण व नोकरीच्या निमित्ताने विदेश गाठणारे मतदानाकडे पाठ फिरवल्याचे चित्र नेहमीच दिसून येते. मात्र, विदेशात शिक्षण घेणाऱ्या एका तरुण विद्यार्थ्याने राष्ट्रीय कर्तव्याचे भान जोपासात मतदानासाठी सिंगापूरवरून थेट अकोला गाठले. तरुणाने आपला मतदानाचा हक्क बजावला.

आणखी वाचा-मोबाईलच्या प्रकाशात करावी लागली मतदानाची तयारी; मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांचे बेहाल…

अकोला येथील युवा मतदार परिमल असनारे शिक्षणानिमित्त सिंगापूर येथे असतात. मात्र, मतदान हा आपला महत्त्वाचा अधिकार असून तो प्रत्येकाने बजावला पाहिजे, असा संदेश परिमल असनारे यांनी दिला. सिंगापूरवरून येत अकोला येथील एलआरटी महाविद्यालयातील मतदान केंद्रावर त्यांनी मतदान केले. यावेळी त्यांनी प्रत्येकाने मतदान करावे व लोकशाही मजबूत करावी. सिंगापूरवरून येत मतदानाचा हक्क मी बजावला आहे आपणही बजवावा, असे आवाहन त्यांनी केले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Akola loksabha election 2024 young man parimal asanare reached akola from singapore for voting ppd 88 mrj