अकोला : ओडिशातून हरवलेली महिला चार वर्षांपूर्वी अकोला जिल्ह्यात भटकंती करताना आढळली होती. कुटुंबाने ती मरण पावल्याचे गृहीत देखील धरले होते. कुटुंबापासून दुरावलेली ही महिला प्रशासनाच्या विशेष प्रयत्नातून आपल्या कुटुंबात मंगळवारी परतली आहे. या भेटीनंतर महिला व कुटुंबीयांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले होते.

जिल्ह्यातील बोरगाव मंजू पोलिसांना २०२० मध्ये साधारणत: ४० वर्षांची एक महिला भटकत असताना आढळली. त्यांनी तिला निवाऱ्यासाठी अकोल्यातील जागृती महिला राज्यगृहात दाखल केले. महिलेची मानसिक स्थिती ठिक नव्हती. तिच्याशी संवाद साधताना भाषेचाही अडसर येत होता. त्या महिलेला जिल्हा सामान्य रुग्णालयातील मानसोपचार तज्ज्ञांकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले. त्यानंतर तिच्यावर औषधोपचार सुरू झाले. महिलेच्या मानसिक स्थितीत सुधारणा झाल्यानंतर ‘चाइल्ड हेल्पलाईन’च्या समन्वयक हर्षाली गजभिये यांनी त्या महिलेचे समुपदेशन करण्यास सुरुवात केली. वेळोवेळी त्या महिलेकडून माहिती घेतल्या जात होती. या संवादातून तिचे नाव रमाबाटी व तिच्या गावाचे नाव दंडागुडा हे असल्याचे समोर आले. त्यानंतर गावाच्या नावाचा शोध घेण्यात आला.

Two youths died after drowning in a tank in Bhalivali vasai news
भालिवली येथील कुंडात बुडून दोन तरुणांचा मृत्यू
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Woman dies after falling off her bike in Kondhwa Pune news
कोंढव्यात दुचाकी घसरुन महिलेचा मृत्यू; दुचाकीस्वार पती जखमी
student could not bear stress of studying she became depressed and left home
मुलं मुली असे का वागतात? नैराश्य, अभ्यासाचा ताण, चिंता, घर सोडणे…
bihar man murder Mumbai
मुंबई: हातावर गोंदवलेल्या प्रेयसीच्या नावामुळे लागला हत्येचा छडा, प्रेमप्रकरणावरून बिहारमधील तरुणाची मुंबईत हत्या
passenger two-wheeler died, dumper hit Bopodi,
डंपरच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी तरुणाचा मृत्यू, मुंबई-पुणे रस्त्यावरील बोपोडीत अपघात
selfie point shock death
भाईंदर: महापालिकेच्या सेल्फी पॉईंटमधील विजेचा धक्का, जखमी मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू

महिलेने जिल्ह्यातील मोठ्या रुग्णालयाचे नाव सांगितले. ते गुगलच्या माध्यमातून शोधण्यात आले. रुग्णालयाचे छायाचित्र महिलेला दाखवले. या प्रयत्नातून त्या महिलेचा जिल्हा नाबारंगपूर असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर कार्यवाहीला गती मिळाली. महिला व बालविकास अधिकाऱ्यांनी तत्काळ तिच्या जिल्ह्यातील ‘सखी वन स्टॉप’ केंद्राशी संपर्क करून त्या महिलेचे छायाचित्र व माहिती पाठवली. जिल्हा यंत्रणेकडून ती महिला राहत असलेल्या गावात तिच्या कुटुंबाचा शोध घेण्यात आला. त्या महिलेचा तिच्या कुटुंबियांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संपर्क करून देण्यात आला.

हेही वाचा – पूजा खेडकरप्रमाणे ३५९ उमेदवारांनी बळकावली नोकरी… आता फेरतपासणीत…

ओडिशातील जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यासह महिलेचे पती अकोल्यात दाखल झाले. महिला व बालविकास कार्यालयाने प्रक्रिया पूर्ण करून महिलेला तिच्या पतीकडे सुपुर्द केले. ओरिसा राज्यातील एका लाडक्या बहिणीला तिच्या कुटुंबापर्यंत पोहोचवण्यात मोठे समाधान असल्याची भावना विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी व्यक्त केली.

हेही वाचा – बुलढाणा : शेगाव संस्थानात जन्माष्टमीला सनई चौघड्याचे सूर, भक्तांचा मेळा…

‘आम्ही तिला शोधण्याचा खूप प्रयत्न केला; पण ती सापडली नाही. ती मरण पावल्याचे समजून आम्ही रितीप्रमाणे विधी करण्याचेसुद्धा निश्चित केले. मात्र, आज आम्हाला ती परत मिळाली, याचा खूप आनंद आहे,’ असे महिलेचे पती म्हणाले.