उन्हाळ्याच्या दिवसांत पाणीकपात करण्याचा निर्णय अकोला महापालिकेने घेतला आहे.शहरात आता महापालिकेकडून चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.अकोला शहराला महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून महान येथील धरणातून करण्यात येतो. तापमान वाढीमुळे बाष्पीभवन होत आहे.
हेही वाचा >>>शरद पवारांमुळे शेतकरी आत्महत्येस प्रवृत्त!, चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका
धरणातील पाणीसाठ्यात घट होत आहे. उपलब्ध जलसाठा लक्षात घेऊन नियोजन करण्यात आले. उन्हाळ्याचे दिवस लक्षात घेता अकोला महानगरपालिका क्षेत्रामध्ये होणाऱ्या पाणी पुरवठा वेळापत्रकामध्ये प्रशासनाकडून बदल करण्यात आले आहेत. शहरातील पाणी पुरवठा तीन दिवस आड चौथ्या दिवशी करण्यात येणार आहे.
हेही वाचा >>>बुलढाणा: बारावी पेपरफुटीप्रकरणी सहा जण ताब्यात; मुख्य सूत्रधाराचा कसोशीने शोध
पाणी पुरवठ्याचा कालावधी वाढल्यामुळे शहरातील नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागणार आहे. तांत्रिक कारणावरून शहरातील पाणीपुरवठा वारंवार विस्कळीत होण्याचा प्रयत्न अकोलेकरांना नेहमीच येतो. शिवाय जलवाहिनी फुटून पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय देखील होतो. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने त्या दृष्टीने देखील नियोजन करण्याची गरज आहे.