अकोला : बाप-लेकीच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारे दुष्कृत्य एका नराधम बापाने केले. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा पोलीस ठाण्यांतर्गत नराधम बापाने पोटच्या १४ वर्षीय मुलीवर वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुलीला जीवे मारण्याची धमकीदेखील बापाने दिली होती. या प्रकरणी पोलिसांनी नराधम बापाला बेड्या ठोकल्या.
हेही वाचा >>> नागपूर : पोटच्या मुलीवर सतत तीन वर्षे अत्याचार, नराधम पित्याला पंधरा वर्षे कारावास
आई कामाला गेल्यावर आरोपी बाप आपल्या पोटच्या मुलीसोबत घृणास्पद कृत्य करीत होता. कुणाला सांगितल्यास त्याने जीवे मारण्याची धमकी तिला दिली होती. मुलीने हिम्मत करून आपल्या आईला घडलेला प्रकार सांगितला. हे ऐकून आईला धक्काच बसला. आईने पीडित मुलीसह पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांना माहिती देत फिर्याद दिली. यावरून तेल्हारा पोलिसांनी रात्री गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीस तत्काळ अटक केली आहे. या घटनेवरून नराधम बापाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.