अकोला : अल्पवयीन मुलांच्या हातात वाहन देत असाल तर आपणास सावध होण्याची गरज आहे. विनापरवाना अल्पवयीन वाहनचालकांमुळे त्यांच्यासह मार्गावरील इतरांचे जीवदेखील धोक्यात येऊ शकतात. पुणे येथील घटनेनंतर हा मुद्दा प्रकर्षाने समोर आला आहे. अल्पवयीन मुलांच्या हातात वाहन देणाऱ्या पालकांवर कठोर कारवाईची तरतूद कायद्यात आहे. या प्रकरणांमध्ये अकोला शहर वाहतूक शाखा ‘ॲक्शन मोड’ मध्ये आली. अल्पवयीन मुलांना वाहन चालवण्यास दिल्याप्रकरणी दोन पालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अल्पवयीन मुलांना वाहन चालवण्याचा परवाना मिळत नसला तरी त्यांच्याकडून वाहन चालवण्याचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढले आहे. अल्पवयीन मुलांना वाहन चालवण्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले जात नाही. वाहतुकीचे नियमांची माहिती नसते. तरी देखील पालकांडून त्यांना वाहन चालवण्यास दिले जाते. मात्र, या वाहन चालकांमुळे अपघात होऊन रस्त्यावर चालणाऱ्या निरपराध लोकांसह इतर वाहनधारक व स्वत: अल्पवयीन वाहन चालकांची जीवित हानी व मोठी दुखापत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
Pune city Shiv Sena uddhav thackeray eknath shinde
शिवसेनेला पुणेकरांचा ‘जय महाराष्ट्र’?
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा…गोदी मीडियाचे एक्झिट पोल! नाना पटोलेंचा आरोप, म्हणाले,‘केंद्रीय गृहमंत्रालयाने १५० जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावले’

या सर्व पार्श्वभूमीवर शहर वाहतूक नियंत्रण शाखेसह जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये १८ वर्षांखालील अल्पवयीन वाहन चालवणारे वाहन चालक, मालक व पालक यांच्यावर मोवाका व भा.दं.वि. प्रमाणे गुन्हे दाखल करण्याची मोहीम सुरू करण्यात आली. या मोहिमेमध्ये शहरातील खदान व सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या परिसरामध्ये दोन अल्पवयीन वाहन चालक आढळून आले. त्यांच्या दोन पालकावर गुन्हे नोंद करण्यात आला आहे. हे गुन्हे न्यायालयात दाखल करण्यात येणार असून त्या गुन्ह्यामध्ये तीन वर्षांपर्यंत शिक्षा व २५ हजार रुपये दंड व अल्पवयीन मुलांना वयाच्या २५ वर्षापर्यंत वाहन चालवण्याचा परवाना मिळणार नाही, अशा शिक्षेची कायद्यात तरतूद आहे.

हेही वाचा…Monsoon Update : विदर्भात आजपासून मान्सूनपूर्व पावसाची शक्यता; हवामान खात्याच्या अंदाजानुसार…

आगामी काळात अनुज्ञप्ती न बाळगणाऱ्या किंवा अल्पवयीन व्यक्तीला वाहन चालवण्याची परवानगी देणाऱ्या वाहन मालक व पालकांविरुद्ध मोवाका व भा.दं.वि. प्रमाणे गुन्हे नोंद करून कडक कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. सर्व पालकांनी आपल्या १८ वर्षाखालील अल्पवयीन मुलांना वाहन चालवण्यास देऊ नये, तसे आढळल्यास कायदेशीर कारवाईला तोंड द्यावे लागणार आहे, असा इशारा अकोला पोलिसांकडून देण्यात आला आहे.

Story img Loader