अकोला : कलेचा वारसा लाभलेल्या अकोला शहरात सांस्कृतिक भवनाची आवश्यकता आहे. निर्माणाधीन सांस्कृतिक भवनाची इमारत लोकार्पणापूर्वीच अडगळीत पडली आहे. निधीअभावी भवनाचे काम बंद पडले आहे. सांस्कृतिक भवनाचे काम पूर्ण करण्याची मागणी कलावंत सांस्कृतिक समितीने आमदार रणधीर सावरकर व जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अकोला सकल कलावंत सांस्कृतिक मंचने एक सभा घेतली. त्यामध्ये नाट्य, नृत्य, गायन, लोककला, संगीत, साहित्य, चित्रकला, छायाचित्रकार व इतर सर्व क्षेत्रातील कलावंत सहभाग झाले होते. या सभेत आमदार व जिल्हाधिकाऱ्यांना नवीन सांस्कृतिक भवन निर्मितीसाठी निवेदन देण्याचे ठरले. त्यानुसार मंचच्यावतीने आमदार रणधीर सावरकर व जिल्हाधिकारी अजित कुंभार यांची भेट घेऊन निवेदन दिले. क्रीडा संकुल येथील सांस्कृतिक भवन त्वरित पूर्ण करावे, स्व. प्रमिलाताई ओक सभागृहाचे दर कमी करण्यासाठी योग्य ते पाऊल उचलावे, नाट्यकलावंतांसाठी हक्काची तालमीची जागा त्वरित उपलब्ध करून द्यावी, अकोल्यातील इतर कार्यक्रम सादरीकरणासाठी लहान नाट्यगृह उभारावे आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा : चंद्रपुरात वाघाला पळविण्यासाठी मुखवट्याचा प्रयोग

या मागण्यांना आ.सावरकर व जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. सांस्कृतिक कार्य मंत्र्यामार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन आवश्यक तो निधी तात्काळ उपलब्ध करुन देण्यात येईल. कलावतांच्या मागण्यांसंदर्भात पाठपुरावा करू, असे आश्वासन आ.सावरकर यांनी दिले. यावेळी कलावंत सांस्कृतिक मंचचे दिलीप देशपांडे, शाहीर वसंत मानवटकर, प्रा. तुकाराम बिरकड, प्रा. निलेश जळमकर, प्रशांत जामदार, सचिन गिरी, सुधाकर गिते, देवेंद्र देशमुख, किशोर बळी, निलेश देव, नीरज भांगे, अनिल कुलकर्णी आदींसह बहुसंख्य कलावंत उपस्थित होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Akola statement given to district collector and mla randhir savarkar to complete the building work of the cultural building ppd 88 css
Show comments