अकोला : दूषित पाण्यामुळे अकोला पोलीस प्रशिक्षण केंद्रातील तब्बल ६० हून अधिक महिला पोलिसांची प्रकृती बिघडल्याची घटना शुक्रवारी घडली. खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – उमेदवारीसाठी वसंत मोरेंची वणवण

हेही वाचा – अरुणाचल प्रदेशसह लक्षद्वीपमध्ये राष्ट्रवादीला घड्याळ चिन्ह मिळणार, राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांचा दावा

अकोला पोलीस प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थी महिला पोलीस कर्मचाऱ्यांना मळमळ आणि उलट्या होत होत्या. त्यांना सुरुवातीला शासकीय रुग्णालयात प्राथमिक तपासणीसाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर सर्वांना खासगी रुग्णालयात दाखल केले. सुमारे ६० पेक्षा जास्त महिला पोलिसांची प्रकृती बिघडली असून काहींना प्रथमोपचार करून परत पाठवण्यात आले आहे. दूषित पाणी प्राशन केल्यामुळे प्रशिक्षणार्थी महिला पोलिसांची प्रकृती बिघडल्याचे प्राथमिक कारण समोर आले आहे. काहींना उन्हाचादेखील फटका बसला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Akola the condition of 60 women police in the training center has deteriorated sunstroke with contaminated water ppd 88 ssb