अकोला : जिल्ह्याच्या तेल्हारा तालुक्यातील बेलखेड गावात दूषित पाण्यामुळे ४९ ग्रामस्थांची प्रकृती गेल्या काही दिवसांमध्ये बिघडली आहे. या सर्व ग्रामस्थांवर गावातच १४ विशेष वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तपासणी पथकाकडून उपचार सुरू आहेत. तीन जणांवर अकोल्यातील शासकीय रुग्णालय आणि अन्य तिघांना तेल्हाराच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

तेल्हारा तालुक्यातील बेलखेड येथे ग्रामपंचायतद्वारे कुपनलिकेद्वारे पाणीपुरवठा केला जातो. दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ग्रामपंचायत प्रशासनासह आरोग्य विभागाने दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांचे आरोग्य बिघडले, असा संताप व्यक्त करण्यात आला. दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये ४९ वर ग्रामस्थांना अतिसार व उलटीचा त्रास होऊ लागला. अनेकांची प्रकृती एकाच वेळी बिघडल्याने आरोग्य पथक गावात दाखल झाले. बेलखेड येथे सहा सुपरवायझर, एक विस्तार अधिकारी, रुग्णांच्या उपचारासाठी १० समुदाय आरोग्य अधिकारी, सहा एमबीबीएस डॉक्टर, दोन तालुका अधिकारी, एक जिल्हास्तरीय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहे. गावकऱ्यांनी दूषित पाणी पिऊ नये, कोणतेही लक्षण आढळ्यास जवळील आरोग्य अधिकाऱ्यांस दाखवून उपचार करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी बळीराम गाळवे यांनी केले. दरम्यान, पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा – “कृषिमंत्र्यांना लाल आणि हिरव्या मिर्चीतील फरक तरी कळतो का?” यशोमती ठाकूर यांची बोचरी टीका; म्हणाल्या…

हेही वाचा – बुलढाणा : तीनशे गावांत पाणीटंचाई, साडेतीन लाख ग्रामस्थांची होरपळ

ग्रामीण भागात पाणीटंचाईचे चटके

जिल्ह्यातील ग्रामीण भागात उन्हाच्या तीव्र झळांसोबतच भीषण पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागत आहेत. पाणीटंचाई निवारणार्थ प्रस्तावित उपाययोजनांपैकी अनेक कामे अद्यापही कागदावरच आहेत. त्यामुळे भर उन्हाळ्यात ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. जिल्ह्यात दरवर्षीचा उन्हाळा हा पाणीटंचाईचा काळ असतो. यावर्षीही पाणीटंचाईच्या तीव्र झळा सोसाव्या लागत आहेत. खारपाणपट्ट्यातील ग्रामस्थांचे तर चांगलेच हाल होताना दिसतात. नैसर्गिक पाण्याचे स्रोत आटले आहेत. तापत्या उन्हाच्या पाऱ्यासोबतच जिल्ह्यातील विविध भागात पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे. पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांची कामे खोळंबल्याने, पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागते. खारपाणपट्ट्यात ज्या भागात पिण्यायोग्य पाण्याचे स्रोत नाही, त्या गावांमध्ये पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर होत आहे. अनेक गावात बैलगाडी, सायकल, ऑटोमधून पिण्याचे पाणी ग्रामस्थांना आणावे लागत आहे. पाण्याचे दुर्भिक्ष लक्षात घेता ग्रामस्थांना दूषित पाण्यावर दिवस ढकलावे लागते. त्यातूनच ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्नाने देखील डोके वर काढले आहे.

Story img Loader