अकोला : महापालिकेद्वारे भोड येथे ‘स्वच्छ भारत अभियान, घनकचरा व्‍यवस्‍थापन’ अंतर्गत २० टन प्रतिदिवस क्षमतेचा बायोगॅस प्रकल्‍प उभारण्यात आला. या प्रकल्पाचे महाराष्‍ट्रदिनी आ. रणधीर सावरकर यांच्‍या हस्‍ते लोकार्पण करण्यात आले. शहरातील ओला कचऱ्यावर शास्‍त्रोक्‍त पद्धतीने प्रक्रिया करून बायोगॅस, खत आणि वीज निर्मिती केली जाणार आहे.

‘स्‍वच्‍छ भारत अभियान’ अंतर्गत पहिला टप्प्यामध्‍ये बायोगॅस प्रकल्‍पाचा समावेश असून महापालिकेने भोड येथे बायोगॅस प्रकल्‍प सुरू केला. या प्रकल्‍पाच्‍या माध्‍यमातून शहरात दै‍नंदिन निघणाऱ्या ओल्या कचऱ्यावर शास्‍त्रोक्‍त पद्धतीने प्रक्रिया करण्यात येईल. त्यातून बायोगॅस, खत आणि वीज निर्मिती होणार आहे. या प्रकल्‍पाच्‍या माध्‍यमातून दररोज २० टन ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लागणार आहे. याचसोबत बायोगॅस प्रकल्‍पापासून १२०० ते १३०० घनमीटर गॅसची निर्मिती होणार असून, प्रकल्‍पामध्‍ये निघालेल्‍या गॅसचा वापर करून दररोज १५०० ते १६०० युनीट वीज निर्मितीसुद्धा होणार आहे. या विजेचा वापर प्रकल्‍प चालविण्‍यासाठी होईल.

air pollution in Mumbai news
मुंबईची हवा पुन्हा प्रदूषित; कुलाबा, कांदिवली येथे ‘वाईट’ हवेची नोंद
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
50 to 60 school students hospitalised after lpg gas leak at jsw company in jaigad
जयगड येथील जेएसडब्ल्यू कंपनीमध्ये एलपीजी वायू गळती; नांदिवडे माध्यमिक विद्यालयाच्या ५० ते ६० विद्यार्थ्यांना त्रास
Graded Response Action Plan project to monitor air pollution Pune news
पिंपरी: हवा प्रदूषणावर आता ‘ग्रॅप’ची नजर; प्रदूषण करणारे उद्योग…
third party organizations will do scrap disposal appointment of three organizations after tender process
त्रयस्थ संस्थांकडे भंगार विल्हेवाट, निविदा प्रक्रियेअंती तीन संस्थांची नियुक्ती
Pune, sewage channels covering Pune, Pune Municipal Corporation, sewage pune, pune latest news,
पुणे : सांडपाणी वाहिन्यांची झाकणे समपातळीवर आणण्यासाठी महापालिकेने उचलले पाऊल !
Thane , government projects, dust, health,
सरकारी प्रकल्पांमुळेच धुळधाण, नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता
Lakshmi Road will be closed again within three months after Ganeshotsav
गणेशोत्सवानंतर तीन महिन्यातच ‘लक्ष्मी रस्ता’ पुन्हा राहणार बंद, काय आहे कारण?

हेही वाचा – ऐन उन्हाळ्यात विदर्भाचे ‘काश्मीर’ दाट धुक्यात हरवले…

प्रकल्पामुळे घनकचऱ्यापासून होणारे दुष्‍परिणाम आणि घातक कार्बन उत्‍सजर्नाला आळा बसणार आहे. यामुळे पर्यावरणाचा होणारा ऱ्हासही थांबणार आहे. प्रकल्‍पाच्‍या माध्‍यमातून तयार होणारे खत शेतकऱ्यांना योग्य दरात दिले जाईल.

हेही वाचा – नागपूर : अचानक मालगाडी मागे आली आणि…

…तर दंडात्मक कारवाई

‘स्‍वच्‍छ भारत अभियान’ अंतर्गत अकोला शहर स्‍वच्‍छ व सुंदर बनविण्‍यासाठी शहरातील सर्व व्‍यावसायिक प्रतिष्‍ठानधारक तसेच निवासी मालमत्‍ता धारकांनी घनकचऱ्याचे विलगीकरण करावे आणि महापालिकेच्या घंटा गाडीमध्‍येच टाकावे, असे आवाहन महापालिका आयुक्‍त तथा प्रशासक कविता द्विवेदी यांनी केले. घाउक कचरा निर्मिती करताना ओला कचरा व वाळलेल्या कचऱ्याचे वर्गीकरण न झाल्यास त्यांच्याविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिकेकडून देण्यात आला आहे.

Story img Loader