नागपूर : दारुड्या बापाने सख्ख्या १४ वर्षीय मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊन बळजबरी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. गेल्या तीन महिन्यांपासून ती मुलगी बापाचा लैंगिक अत्याचार सहन करीत होती. शेवटी आईला प्रकार सांगितल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली. लकडगंज पोलिसांनी तक्रारीवरुन बापाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

आरोपी किसन (बदललेले नाव) हा बेरोजगार असून पत्नी, मुलगी आणि मुलासह लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहतो. तो गेल्या चार वर्षांपासून बेरोजगार असून त्याला दारुचे व्यसन आहे. किसन कामाला जात नसल्यामुळे पत्नी घराबाहेर पडली. ती खासगी काम करुन संसाराचा गाडा हाकते. मुलगी १४ वर्षाची असून ती नवव्या वर्गात तर मुलगा पाचवीत आहे. दारुड्या किसनाची गेल्या काही दिवसांपासून आपल्या सख्ख्या मुलीवर वाईट नजर होती. गेल्या तीन महिन्यांपासून तो तिला बाहुपाशात घेऊन अश्लील चाळे करीत होता. ‘तू आता मोठी झाली आहेस, म्हणून मी तुझा लाड करीत आहे.’ असे सांगून तो वारंवार तिच्याशी लगट करीत होता. मुलीने बापाच्या या घाणरेड्या कृत्याकडे दुर्लक्ष केले. मुलगी आंघोळ करुन बाहेर आल्यानंतर तिला कपडे त्याच्यासमोरच कपडे बदलण्याची सक्ती करीत होता. गेल्या काही दिवसांपूर्वी पत्नी नातेवाईकाकडे धार्मिक समारंभासाठी गेली असताना मध्यरात्रीनंतर झोपेत असलेल्या मुलीशी बापाने अश्लील कृत्य केले. शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलीने नकार दिला. त्यामुळे तिला बापाने मारहाण केली. त्यानंतर बळजबरी शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

Bollywood Artists News, Marathi news
Saif Ali Khan Attack : सैफ अली खानच नाही तर सलमान खान, रवीना टंडन यांच्यासह ‘या’ कलाकारांवरही झाला होता हल्ला
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि काँग्रेस नेत्यावर सामूहिक बलात्काराचा गुन्हा; नेमकं प्रकरण काय? (फोटो सौजन्य पीटीआय)
भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि काँग्रेस नेत्यावर सामूहिक बलात्काराचा गुन्हा; नेमकं प्रकरण काय?
Crime News
Crime News : हत्या करावी की नाही? हे टॉस करून ठरवलं; १८ वर्षीय तरूणीच्या मृतदेहावर बलात्कार करणाऱ्या नराधमाची कोर्टात धक्कादायक कबुली
Manoj Jarange
Manoj Jarange : मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांना सवाल, “खंडणीतला आरोपी तुमचं सरकार….”
Neena Gupta aunt threw her out after daughter Masaba birth
लग्न न करता झालेली आई, एकदा काकूने अचानक मध्यरात्री…; बॉलीवूड अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली…
Girl's Hair Cut case At Dadar Station
“म्हणून मी तिचे केस कापले…”, दादर स्थानकात तरुणीचे केस कापणाऱ्या आरोपीचा धक्कादायक खुलासा
What Bajrang Sonawane Said?
Bajrang Sonawane : “संतोष देशमुख हत्या प्रकरणातले आरोपी खरं सांगत नसतील तर त्यांना…”, बजरंग सोनावणेंचं वक्तव्य

हेही वाचा >>> ५९ वर्षीय वृद्धाचे १७ वर्षीय तरुणीवर जडले एकतर्फी प्रेम, प्रेमापोटी केले असे काही की…

आईला जीवे मारण्याची धमकी

पत्नी कामावर गेल्यानंतर किसन हा मुलाला खेळायला बाहेर पाठवायचा. त्यानंतर मुलीला शारीरिक संबंधाची मागणी करायचा. ती अनेकदा त्याला नकार द्यायची. त्यानंतर तो शिक्षण बंद करण्याची धमकी द्यायचा. तसेच आईला जीवे मारण्याची धमकी द्यायचा. त्यामुळे मुलगी घाबरुन त्याला संबंधासाठी होकार द्यायची. शिक्षण बंद आणि आईच्या जीवाला धोका असल्यामुळे झालेला प्रकार ती आईला सांगत नव्हती.

हेही वाचा >>> देवी विसर्जनादरम्यान तलावातील खड्ड्यात पडून तिघांचा मृत्यू

नातेवाईकांनी दिली हिम्मत

गेल्या आठवड्यात आई कामावरुन लवकर घरी आल्यानंतर मुलीने पोटात दुखत असल्याचे सांगून रडायला लागली. आईने तिची आस्थेने विचारपूस केल्यानंतर वडिलांनी नुकताच शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचे सांगितले. त्यामुळे चिडलेल्या पत्नीने पतीला विचारणा केली. त्याने कबुली दिली आणि पोलिसात गेल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे महिलेने काही नातेवाईकांना घडलेला प्रकार सांगितला. नातेवाईकांनी हिम्मत दिल्यामुळे ती मुलीला घेऊन पोलीस ठाण्यात गेली. लकडगंज पोलिसांनी तक्रारीवरुन गुन्हा दाखल केला.

Story img Loader