नागपूर : नागपूर महापालिकेच्या मृत्यू विश्लेषण समितीने पहिल्या ‘एच ३ एन २’ ग्रस्त रुग्णाच्या मृत्यूला विषाणू नव्हे तर इतर सहआजार कारण असल्याचा निष्कर्ष दिला असतानाच आता एम्समध्ये या विषाणूने ग्रस्त एका रुग्णाच्या मृत्यूने चिंता वाढली आहे. तर एका खासगी रुग्णालयात ५ रुग्णाची महिन्याभरात नोंद झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एम्सला दगावलेल्या ३५ वर्षीय रुग्णाला हृदयाचा गंभीर आजार होता. तपासणीत त्याला हा आजार असल्याचे पुढे आले. त्याचा १४ मार्चला मृत्यू झाला. आता मृत्यू विश्लेषण समिती हा मृत्यू कशाने यावर बैठकीत निर्णय घेणार आहे. तर प्रथम खासगी रुग्णालयात दगवलेल्या ‘एच ३ एन २’ विषाणूग्रस्त रुग्णाला सीओपीडी, मूत्रपिंड, हृदयरोग, निमोनियासह इतरही सहआजार होते. या आजारांच्या गुंतागुंतीनेच रुग्ण दगावल्याचा निष्कर्ष मृत्यू अंकेक्षण समितीने लावला. दुसरीकडे एका रुग्णालयात या आजाराचे पाच रुग्ण आढळले, तर सर्वत्र या लक्षणाचे रुग्ण दिसत असल्याने नागपुरात ‘एच ३ एन २’ च्या उद्रेकाचा अंदाज व्यक्त होत आहे. आरोग्य विभागाने त्यावर सर्व रुग्णालयांना स्वाईन फ्लूसोबत या विषाणूच्याही चाचणीच्या सूचना केल्या आहे.

हेही वाचा… शालांत विद्यार्थ्यांच्या अतिरिक्त गुणवाढीस पुन्हा मुदतवाढ, या तारखेपर्यंत..

रंदासपेठच्या खासगी रुग्णालयात महिन्याभरात या आजाराचे सुमारे ५ रुग्ण नोंदवले गेले आहे. हे सगळे गंभीर संवर्गातील रुग्ण आहेत. त्यापैकी चौघे बरे होऊन घरी गेले तर एकाचा मृत्यू झाला. चाचण्यांमुळे हा आजार सष्ट झाला असला तरी इतर शहरभरात या आजाराचे लक्षण असलेल्यांच्या चाचण्यात होत नाही. त्यामुळे या आजाराची नेमकी संख्या येत नसल्याचा वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांचा दावा आहे. दरम्यान महापालिकेने या आजाराचे गांभीर्य बघत आता सगळ्या रुग्णालयांना एच १ एन १ या स्वाईन फ्लूसोबतच एच ३ एन २ या चाचणीच्याही सूचना केल्या आहेत. सोबत प्रत्येक स्वाईन फ्लू व नवीन विषाणूग्रस्त रुग्णांची माहिती देण्याच्याही सूचना दिल्या आहे. दरम्यान, नवीन विषाणूची चाचणी खासगी प्रयोगशाळेत महाग आहे. त्यामुळे नातेवाईक चाचणीला तयार होत नाही. त्यामुळे चाचणीच्या मुद्यावर खासगी रुग्णालयात रुग्ण व रुग्णालय प्रशासनात वाद उद्भवण्याचीही शक्यता व्यक्त होत आहे.

हेही वाचा… नागपूर : संपात सहभागी झालेल्या २१९ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

उपराजधानीत रुग्णालयांत दाखल गंभीर रुग्णांची चाचणी होत आहे. त्यामुळे काही रुग्ण आढळले. चाचणी वाढल्यास रुग्णसंख्या वाढेल. प्रत्येकाने काळजी घेतल्यास हा आजार नियंत्रणात येऊ शकतो. महापालिकेने चाचणी वाढवण्याची चांगली सूचना केली. परंतु अनेक नातेवाईक या महागड्या चाचणीला तयार होत नाही. त्यामुळे शासकीय चाचणी केंद्रात ही चाचणी नि:शुल्क केल्यास रुग्णांना लाभ शक्य आहे. – डॉ. अशोक अरबट, अध्यक्ष, विदर्भ हाॅस्पिटल असोसिएशन.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Alert another patient died in nagpur due to h3n2 virus mnb asj