लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर: माझ्या पत्नीला खुश करण्यासाठी नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) नेत्र विभागात आयोजित कार्यक्रमाला आलो, असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

मेडिकलमध्ये शनिवारी नेत्रदान पंधरवड्यानिमित्त जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्याला हिरवी झेंडी दाखवून मुनगंटीवार यांनी रॅलीचा शुभारंभ केला. त्यापूर्वी कार्यक्रमात मुनगंटीवार म्हणाले, येथे येण्याची माझ्यावर सक्ती होती. कारण निमंत्रण मला माझ्या पत्नीने दिले होते. मेडिकलशी माझे जवळचे नाते आहे. वडिलांनी १९६० मध्ये येथूनच एमबीबीएसचे शिक्षण घेतले.

आणखी वाचा-खासदारांचा पारा भडकतो तेव्हा…; बैठकीत अधिकाऱ्यांना सुनावले

भाऊही येथेच एमबीबीएस झाले. माझ्या घरात मी सोडून सगळेच डॉक्टर आहेत. त्यामुळे माझे वैद्यकीय क्षेत्र व मेडिकलशी जवळचे नाते आहे. मेडिकलमध्ये माझे नातेवाईकही कार्यरत आहेत. त्यामुळे मला येथे यावेच लागले. मेडिकलमध्ये गरीब रुग्णांवर उपचार होत असल्याने येथे गरिबांच्या डोळ्यांवरील उपचाराच्या सर्व सोयी उपलब्ध असायला हव्यात. नेत्रदान हे श्रेष्ठ दान आहे. नेत्रविभागाला जे हवे ते सर्व शासनाकडून उपलब्ध केले जाईल. जेथे सरकारकडून मदत मिळत नसेल तेथे मला सांगा, मी फाॅरेस्ट कार्पोरेशन डेव्हलपमेंटच्या सामाजिक दायित्व निधीतून मदत करेल, असेही मुनगंटीवार म्हणाले. याप्रसंगी मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये, वैद्यकीय अधीक्षक डॉ. शरद कुचेवार, प्रा. डॉ. अशोक मदान, नेत्ररोग विभागाच्या प्रमुख डॉ. मिनल व्यवहारे, डॉ. कविता धाबर्डे, डॉ. नीलेश गादेवार उपस्थित होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: All doctors except me in my house forest minister sudhir mungantiwar told the story mnb 82 mrj
Show comments