बुलढाणा: जळगाव जामोद येथे सुरू असलेल्या सकल मराठा समाजाच्या आंदोलनात सर्वपक्षीय नेते पक्ष भेद विसरून एकवटल्याचे चित्र आहे. उपविभागीय अधिकारी ( महसूल) यांच्या कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठींबा व मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> नागपूर : लोकप्रतिनिधींच्या घरांची जाळपोळ, तेली समाजाकडून निषेध, दिला इशारा

राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार), शिवसेना (उबाठा), काँग्रेस  आदी पक्षाचे नेते ,पदाधिकारी, कार्यकर्ते व समाज बांधव बहुसंख्येने सहभागी झाले आहे. दरम्यान प्रदेश काँग्रेसच्या सचिव ॲड. जयश्री शेळके यांनी या साखळी उपोषणाला  भेट देऊन पाठिंबा जाहीर केला. शासनाने मराठा समाजाच्या आरक्षणाचा तिढा लवकरात लवकर सोडवावा, अश्या मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत  राज्यपाल यांना पाठवण्यात आले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: All party leaders participation in sakal maratha community protest in jalgaon scm 61 zws
Show comments