मागील काही दिवसांपासून सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडून महापुरुषांचा वारंवार अपमान केला जात आहे. सत्तेचा दुरुपयोग करून धर्माधर्मांमध्ये तेढ निर्माण केली जात आहे. सर्वच महापुरुषांनी देशांमध्ये समता बंधुभाव आणि एकतेचा संदेश दिला आहे. मात्र, केंद्रातील, राज्यातील भाजपचे नेते वारंवार महापुरुषांबद्दल अपशब्द वापरून सत्तेचा दुरुपयोग करीत आहेत, असा आरोप करीत वाशिम येथे सर्वधर्मीय समाज बांधवांनी आज २४ डिसेंबरला मोर्चा काढून एकतेचा संदेश दिला.
हेही वाचा >>> नागपूर: ‘आनंदाचा शिधा’ही चौकशीच्या घेऱ्यात! सभागृहात रणकंदन
या मोर्चामध्ये विविध पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संघटनांचे सदस्य, महिला, युवक युवती मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी महापुरुषांनी दिलेल्या शिकवणीचा जागर करण्यात आला. हा देश विविधतेमध्येही शांततेत राहतो आणि राहील, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. महात्मा फुले चौक येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत हा मोर्चा शांततेत पार पडला. यावेळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
आम्ही चौपाटी परिसरातील भाई आहोत. आमच्या नादी लागला तर जीवे मारू, अशी धमकी देऊन आरोपींनी ओझा याच्या खिशातील अडीच हजार रुपयांची रोकड काढून घेतली. पसार झालेल्या चोरट्यांचा शोध घेण्यात येत असून सहायक पोलीस फौजदार समीर कांबळे तपास करत आहेत.