नागपूर : पावसाळी पर्यटन फक्त माणसांनीच करायचे का ! ते ही आमच्या अधिवासात ! आम्हालाही पावसाळी पर्यटनाचा हक्क आहे. तो आम्ही तुमच्या हद्दीत नाही तर आमच्याच हद्दीत करणार आणि असे म्हणून ते पर्यटनाला निघालेसुद्धा. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या निमढेला बफर क्षेत्रात ‘भानूसखिंडी’ वाघिणीच्या तीन्ही बछड्यांनी कमालच केली. निमढेला जंगलातून वाहणाऱ्या ओढ्यातून ते मनसोक्त इकडेतिकडे हुंदडले. नागपूर येथील वन्यजीव संवर्धक व छायाचित्रकार दीप यांनी त्यांनी हे हुंदडणे अलगदपणे कॅमेऱ्यात टिपले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

निमढेला बफर क्षेत्रातील ‘भानूसखिंडी’ या वाघिणीने भल्याभल्यांना वेड लावले. अगदी क्रिकेटपटू सचिन तेंडूलकरपासून तर अभिनेत्री रविना टंडनपर्यंत. आता फक्त ‘भानूसखिंडी’च नाही तर तिचे बछडेदेखील पर्यटकांना वेड लावत आहेत. त्यांच्या अधिवासातला त्यांचा वावर.. त्यांचे मनसोक्त हुंदडणे.. एकमेकांसोबत दंगामस्ती.. असे सारे काही डोळ्यात साठवण्यासाठी पर्यटक येत असतात.

हेही वाचा… गडचिरोली: गुप्तधन, अंधश्रद्धेपोटी दुर्मिळ खवल्या मांजराची तस्करी, वनविभागाने तिघांना घेतले ताब्यात

मात्र, आजतागायत त्यांच्याच अधिवासातून वाहणाऱ्या खळखळत्या पाण्यातून वाघांचे असे मनसोक्त हुंदडणे फार क्वचितच पर्यटकांच्या नजरेत भरले. कार्बेट व्याघ्रप्रकल्पातून वाहणाऱ्या रामगंगा नदीतून वाघ नेहमीच ‘ऐलतिरावरुन पैलतिरावर’ जात असतात. तिथल्या पर्यटकांनाही ते दिसतात, पण ताडोबात हे क्वचितच घडते. नागपूर येथील दीप काठीकर त्याबाबत सुदैवी ठरले.

हेही वाचा… शोधा बघू! लोभस ‘ गोसावी ‘ हरवलाय कुठे?

केवळ छायाचित्रणच नाही तर संवर्धनावर त्यांचा अधिक भर आणि म्हणूनच कदाचित ‘भानूसखिंडी’च्या बछड्यांनी त्यांना असा प्रतिसाद दिला.