नागपूर : भारतीय जनता पक्षाचे आमदार परिणय फुके यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांवर अंबाझरी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा तपास अतिशय संथगतीने सुरू आहे. त्यामुळे अंबाझरी पोलिसांच्या कार्यप्रणालीवर संशय निर्माण झाला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये आ. फुके यांच्यासह त्यांचे वडील रमेश गोविंदराव फुके (७२), आई रमा फुके (६७), पत्नी डॉ. परिणीता फुके (४१) आणि नितीन फुके (४०) यांचा समावेश आहे. फिर्यादी प्रिया फुके यांनी अंबाझरी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, पती संकेत फुके हे किडनीच्या आजाराने त्रस्त होते. मात्र, लग्नाच्या वेळी ही बाब लपवून ठेवण्यात आली होती. ‘आम्ही राजकीय दबावाने काहीही करू शकतो. तू शांत राहिली नाहीस तर तुझ्या आई व बहिणीवर अत्याचार करण्यात येईल’,अशी धमकी सासऱ्यांनी दिली, असे तक्रारीत नमूद आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

फुके कुटुंबीयांनी तिला व संकेतला बाहेर जाण्यास मनाई केली होती. संकेत यांचे सप्टेंबर २०२२ मध्ये निधन झाले. काही दिवसांनंतर फुके कुटुंबीयांनी प्रियाकडून एटीएम, बँकेचे पासबुक, पासवर्ड रेकॉर्ड, दागिने जबरदस्तीने काढून घेतले. संकेतचे ‘अताशा आशीर्वाद बिल्डर्स’मध्ये ४० टक्के शेअर्स होते. ते परस्पर सासू-सासऱ्यांच्या नावाने करून घेतले. याबाबत नितीन फुके यांना विचारणा केली असता प्रिया यांना शिवीगाळ करण्यात आली, असे तक्रारीत नमूद आहे. याप्रकरणी अंबाझरी पोलिसांनी आ. फुकेंसह कुटुंबातील पाच जणांवर गुन्हा दाखल केला होता. मात्र, या तपासाची गती सध्या संथ आहे. अंबाझरीचे ठाणेदार विनायक गोल्हे हे फिर्यादी प्रिया यांनाच पुरावे आणि घटनेचे साक्षीदार आणण्यासाठी दबाब टाकत आहेत. या प्रकरणात मोजक्याच जणांचा जबाब नोंदवण्यात आला. आ. परिणय फुके यांचा अद्याप जबाब अंबाझरी पोलिसांनी नोंदवला नाही. फुके यांचा जबाब घेण्यासाठी अंबाझरी पोलीस टाळाटाळ का करीत आहेत?, असा सवालही प्रिया यांनी केला आहे. या गुन्ह्याला बळकटी येण्यासाठी पोलीस मुद्दामून तपास व्यवस्थित करीत नसल्याचा आरोप प्रिया फुके यांनी अंबाझरी पोलिसांवर केला आहे.

हे ही वाचा…विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ‘एबीव्हीपी’मध्ये अचानक मोठा बदल… लोकसभेत फटका बसल्याचा परिणाम

फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यास टाळटाळ

संकेतच्या मृत्यूनंतर प्रियाच्या युनियन बँकेच्या धरमपेठ शाखेच्या खात्यात चार कोटी रुपये होते. मात्र, त्यातील ३.३० कोटी रुपये बनावट स्वाक्षरी करत रमेश फुके यांच्या खात्यात वळते करण्यात आले. बँक व्यवस्थापकानेही याबाबत सहकार्य केल्याचा आरोप आहे, ही माहिती पोलिसांना दिल्यानंतरही आतापर्यंत गुन्ह्यात कलमवाढ करण्यात आली नाही, असा आरोपही प्रिया यांनी केला आहे.

हे ही वाचा…तिकीट वाटपातील पटोलेंच्या भूमिकेने काँग्रेस नेते नाराज ? विश्वासात घेतले जात नसल्याची भावना

तपास योग्य दिशेने – पोलीस

प्रिया फुके यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा तपास योग्य दिशेने सुरू आहे. आरोपी सासू-सासऱ्यांचे जबाब नोंदवण्यात आले असून आ. फुके यांनाही सूचनापत्र देण्यात आले आहे. तपास पूर्ण करण्यासाठी दिलेल्या ठराविक वेळेत तपास पूर्ण करून न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात येईल. बँकेतून बनावट सहीने पैसे परस्पर वळते केल्याच्या आरोपीतही आम्ही एका बँक अधिकाऱ्याची चौकशी केली असून तूर्तास यात तथ्य आढळून आले नाही, असे अंबाझरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गोल्हे, यांनी सांगितले