लोकसत्ता टीम

नागपूर: जून महिन्याचा उत्तरार्ध सुरू होऊनही राज्यात मान्सून रखडल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यही पावसाकडे डोळे लावून बसले आहेत. राज्यात तापमान आणि उकाड्यात प्रचंड वाढ झाली आहे. २५ जूननंतरच राज्यात मान्सून पूर्णपणे सक्रीय होईल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. २३ आणि २४ जूननंतर अरबी समुद्रावरुन येणाऱ्या वाऱ्यांना गती मिळेल. त्यामुळे पावसासाठी आणखी एक आठवडा वाट पाहावी लागणार आहे.

Traders reported that price of coriander decreased compared to last week and price of fenugreek is on rise
कोथिंबिरेच्या दरात घट; मेथी तेजीत, फळभाज्यांचे दर स्थिर
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Bad weather in Mumbai Measures against pollution Mumbai print news
मुंबईत निवडणुकीपर्यंत प्रदूषणाचा त्रास; मनुष्यबळाअभावी पालिकेची यंत्रणा हतबल
Mumbai temperature increase
मुंबईचे तापमान वाढण्याची शक्यता
reserve bank of india latest marathi news
विश्लेषण: १४ महिन्यांतील उच्चांकी चलनवाढीमागे कारणे कोणती? व्याजदर कपात आणखी लांबणीवर? जीडीपी वाढही मंदावणार?
India Meteorological Department has warned a rain alert for 15 districts of Maharashtra state
‘या’ १५ जिल्ह्यांना १५ नोव्हेंबरला सतर्कतेचा इशारा !
Cloudy over South Madhya Maharashtra and South Konkan Mumbai print news
राज्यात गुरुवारपासून हलक्या सरी; जाणून घ्या, दिल्लीत दाट धुके का पडले

अवकाळीने राज्यात थैमान माजवल्यानंतर पेरणीसाठी आवश्यक मान्सूनचा पाऊस पडलेला नसल्याने शेतकरी चिंतेत आहे. पावसाअभावी पेरणी करण्यात आली नाही. हवामान अभ्यासक आणि हवामान खात्यानेही शेतकऱ्यांना पेरणीची घाई करु नये असे आवाहन केले आहे. मान्सूनच्या सरी कोसळू द्या आणि मगच पेरणी करा, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

हेही वाचा… नागपूर: ज्येष्ठ साहित्यिक, भाषा व लिपी तज्ज्ञ दिवाकर मोहनी यांचे निधन

सर्वसाधारणपणे ७० ते १०० मिलिमीटर पाऊस झाल्यानंतर पेरणीयोग्य वातावरण निर्माण होते. एकीकडे शेतीची ही स्थिती तर दूसरीकडे धरणातील पाणीसाठा देखल कमी होत आहे. त्यामुळे पाऊस आणखी लांबल्यास आणि पुरेसा पाऊस न झाल्यास काय, अशी चिंता सर्वसामान्यांना सतावत आहे.