लोकसत्ता टीम

गोंदिया : सडक अर्जुनी तालुक्यातील डुंडा ते पांढरीला जोडणाऱ्या एकमात्र नवीन पुलाचे बांधकाम गेल्या कित्येक महिन्यांपासून अत्यंत संथगतीने सुरू आहे. आता पावसाळ्याच्या दिवसांत पर्यायी रस्त्यावर चिखल साचल्याने विद्यार्थी-विद्यार्थिनींसह अन्य नागरिकांना ये-जा करताना मोठी कसरत करावी लागते.

carnac Bridge to be inaugurated in June Additional Commissioner inspects bridge work Mumbai news
कर्नाक पूल जूनमध्ये सुरु होणार; पुलाच्या कामाची अतिरिक्त आयुक्तांनी केली पाहणी
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
water pipe bursts in Dombivli
डोंबिवलीत काँक्रीट रस्ते काम करताना जलवाहिनी फुटली;  पी. पी. चेंबर्सजवळ शेकडो लीटर पाणी वाया
Special trains for Konkan and Goa on year end and long weekend
कोकण, गोव्यासाठी विशेष रेल्वेगाड्या
Work begins on Shirsodi Kugaon bridge in the catchment area of ​​Ujani Dam Pune news
इंदापूर-करमाळा ऋणानुबंध पुन्हा जुळणार; शिरसोडी-कुगाव पुलाच्या कामाला सुरुवात
problem of potholes on Khopta bridge to Koproli road will cleared soon
खोपटे पूल ते कोप्रोली मार्ग लवकरच खड्डेमुक्त, एक किलोमीटर रस्त्याच्या काँक्रीटीकरणासाठी सात कोटींच्या निधीस मंजुरी
road along Seawoods creek flamingo habitat was recommended for closure
फ्लेमिंगोंच्या अधिवासात रस्ता नको, राज्य सरकारच्या पाहणी पथकाच्या अहवालात खाडीकिनारचा रस्ता बंद करण्याची शिफारस
Cyclone Feingal cleared entire state and once again state is heading towards winter
विदर्भ गारठला… गोंदिया ९.४, तर नागपूर, वर्धा १० अंश सेल्सिअस

कधी कोण घसरून पडेल, याचा नेम नाही. काही किरकोळ अपघात देखील या ठिकाणीं घडले आहेत. त्यामुळे संबंधित विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. पांढरी गावात मुख्य बाजारपेठ व रेल्वेस्थानक आहे. त्यामुळे हे गाव परिसरातील ३० ते ३२ गावांचे केंद्रस्थान आहे. या मार्गावर नेहमीच प्रवाशांची तसेच दुचाकी, चारचाकी वाहनचालकांची वर्दळ असते. उन्हाळ्यात पूल बांधकामाची सुरवातच उशिरा झाल्याने आता पावसाळ्यातदेखील पुलाचे बांधकाम पूर्ण झाले नाही. कंत्राटदाराचा हलगर्जीपणा व पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांचा डोळेझाकपणा यामुळे बांधकाम संथगतीने होत असल्याचे परिसरातील नागरिकांमधून बोलले जात आहे.

आणखी वाचा-महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवर तांदूळ माफियांची दहशत! तस्कर ‘वीरप्पन’ला अनेकांची साथ; अधिकाऱ्यांनाही धास्ती

सध्या वाहतुकीसाठी तयार करण्यात आलेल्या पर्यायी पुलावर मुरूमाऐवजी भीस वापरण्यात आली. त्यामुळे संपूर्ण रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. परिणामी, येणाऱ्या-जाणाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. किरकोळ अपघाताच्या संख्येत वाढ झाली आहे. दरम्यान, संबंधित विभागाने वेळीच दखल घेऊन पुलाचे बांधकाम त्वरित पूर्ण करावे, अशी मागणी परिसरातील विद्यार्थी व वाहनचालकांनी केली आहे.

आणखी वाचा- अवैध खनिज उत्खनन व वाहतूकबाबत जिल्हा प्रशासन ‘ॲक्शन’ मोडवर

जून महिन्यांपर्यंत हा पूल रहदारीसाठी खुला व्हायला पाहिजे होता. पण सुरवातीपासूनच पुलाचे बांधकाम संथगतीने सुरू असल्याने आतापर्यंत बांधकाम अपूर्ण आहे. पुलाचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करण्यासंबंधी मी संबंधित विभागाला सूचविले आहे. -सुधा रहांगडाले, जिल्हा परिषद सदस्य.

हा नवीन पूल डुंडा गावच्या नागरिकांसाठी तसेच परिसरातील गावांसाठी अतिमहत्त्वाचा आहे. सुरवातीपासूनच कंत्राटदाराचे या पुलाच्या बांधकामाकडे दुर्लक्ष आहे. पुलाचे बांधकाम अपूर्ण असल्याने येणाऱ्या-जाणाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. -उज्ज्वला हटवार, सरपंच, डुंडा.

Story img Loader