वर्धा:  वर्धा लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे ( शरद पवार गट) खासदार अमर काळे यांना मित्रपक्षांचा विसर पडला काय, अशी शंका सर्वजनिक  चर्चेत उपस्थित केली जात आहे. बदलापूर घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी महाविकास आघाडीने मूक निषेध आंदोलन केले. त्यावेळी खासदार काळे गैरहजर होते. मात्र याच वेळी ते त्यांचे मामा माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या काटोल गावी निषेध आंदोलनात सहभागीझाले होते. तशी पोस्ट त्यांनीच समाज माध्यमांमध्ये टाकली. त्याची  विदर्भ प्रदेश रिपाई ( आंबेडकर ) पक्षाचे अध्यक्ष महेंद्र मुनेश्वर यांनी दखल घेत नाराजी नोंदविली आहे. ते म्हणतात की खासदारांनी या आंदोलनात अवश्य सहभागी होणे अपेक्षित होते. आम्ही तुमच्यासाठी लढलो. आता तुम्ही आमच्या लढ्यात सहभागी व्हायला पाहिजे. पण साधा फोनसुद्धा तुम्ही उचलत नाही. वर्धा बंद वेळी पण टाळले. आघाडीचे अन्य नेते असतात,  हे योग्य आहे का, असा सवाल  मुनेश्वर यांनी केला. यावर काळे यांनी भूमिका मांडावी,अशी मागणी केली. इंडिया आघाडीचे संयोजक अविनाश काकडे यांनी याबद्दल खेद व्यक्त करीत नियोजन कुठे चुकत आहे हे बघावे लागेल, असे उत्तर दिले. खासदार लोकांच्या गराड्यात  रमणाराच  माणूस आहे.

आता खासदार कार्यालय लवकरच सूरू होईल.असे त्यांनी सांगितले. स्थानिक पत्रकार संघांचे अध्यक्ष प्रवीण धोपटे म्हणतात की संपर्कात नसल्याची व फोन घेत नसल्याची खासदारविषयी ओरड आहेच. अद्याप संपर्क कार्यालय नाही, असे त्यांनी निदर्शनास आणले. आघाडीचा अन्य एक नेता म्हणाला की, खासदार काळे निमित्यमात्र येतात. काम आटोपले की एका काँग्रेस नेत्याकडे तळ ठोकतात. आम्ही तिथे कसे भेटणार. राष्ट्रवादीच्या एकाही नेत्यास भेटत नाही, अशीही तक्रार केली तसेच  रुळायला वेळ लागेल ,अशी टिपणी राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्याने केली. खासदार काळे यांनी निवडणूक  प्रतिज्ञापत्रात  मुंबईत तीन तसेच अन्य विविध ठिकाणी घरे  असल्याचे नमूद केले. जिल्हा मुख्यालयी पण त्यांनी घर घेऊन राहल्यास सर्वांना सोयीचे  ठरेल. ही गुंतवणूक पण फायद्याची ठरेल, असा खोचक टोला आघाडीच्या नेत्याने लावला.

amar kale pattern in discussion at wardha district during assembly election
वर्धा: विधानसभेवेळी ‘ अमर ‘ पॅटर्न चालणार ? उमेदवार व मतदारसंघ अदलाबदलीचा सूर.
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
Nitin Gadkari, Wardha, Raksha Bandhan, charity, Smita Kolhe Ties Rakhi to nitin gadkari
बहिणीने राखी बांधली; पण मंत्री असलेल्या भावाकडे ओवाळणीसाठी पैसेच नव्हते, मग…
Datta Meghe, Sharad Pawar, Wardha, Nitin Gadkari, Suresh Deshmukh, political mentor, health challenges, BJP, Congress, Nagpur, Nagpur news, latest news
‘शरद पवारांना भेटण्याची संधी सोडणार कशी’? डॉक्टरांची मनाई तरी हे भाजप नेते वर्ध्यात दाखल
snake enter in MLA pankaj bhoyars house in wardha
Video :आमदारांच्या घरात जहाल विषारी साप; डॉगी भुंकला अन्…
Wardha, violence against women, Kasturba School, chalk drawing, Ladki Bahin Yojana, Eknath Shinde, social media, Chief Minister, protest, rural school,
वर्धा : ‘आमचे काय?’, शालेय विद्यर्थिनींचा चक्क मुख्यमंत्र्यांना…
BJP state president Chandrashekhar Bawankule warned the interested candidates
“खबरदार… कुणाचेही तिकीट कन्फर्म नाही, ते आम्हीच बघू,” भाजपा प्रदेशाध्यक्षांची तंबी
ST bus stops, Awards to ST bus stops,
‘हे’ आहेत एक, दोन, तीन क्रमांकाचे बसस्थानक; स्वच्छ, सुंदर म्हणून पुरस्कार…