वर्धा: वर्धा लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे ( शरद पवार गट) खासदार अमर काळे यांना मित्रपक्षांचा विसर पडला काय, अशी शंका सर्वजनिक चर्चेत उपस्थित केली जात आहे. बदलापूर घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी महाविकास आघाडीने मूक निषेध आंदोलन केले. त्यावेळी खासदार काळे गैरहजर होते. मात्र याच वेळी ते त्यांचे मामा माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या काटोल गावी निषेध आंदोलनात सहभागीझाले होते. तशी पोस्ट त्यांनीच समाज माध्यमांमध्ये टाकली. त्याची विदर्भ प्रदेश रिपाई ( आंबेडकर ) पक्षाचे अध्यक्ष महेंद्र मुनेश्वर यांनी दखल घेत नाराजी नोंदविली आहे. ते म्हणतात की खासदारांनी या आंदोलनात अवश्य सहभागी होणे अपेक्षित होते. आम्ही तुमच्यासाठी लढलो. आता तुम्ही आमच्या लढ्यात सहभागी व्हायला पाहिजे. पण साधा फोनसुद्धा तुम्ही उचलत नाही. वर्धा बंद वेळी पण टाळले. आघाडीचे अन्य नेते असतात, हे योग्य आहे का, असा सवाल मुनेश्वर यांनी केला. यावर काळे यांनी भूमिका मांडावी,अशी मागणी केली. इंडिया आघाडीचे संयोजक अविनाश काकडे यांनी याबद्दल खेद व्यक्त करीत नियोजन कुठे चुकत आहे हे बघावे लागेल, असे उत्तर दिले. खासदार लोकांच्या गराड्यात रमणाराच माणूस आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा