वर्धा : अखेर महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून घोषित झालेले माजी आमदार अमर काळे आता निवडणुकीच्या तयारीस लागले आहेत. उमेदवारीचे नामांकन पत्रे सादर करण्यासाठी त्यांनी दोन एप्रिल ही तारीख निवडली आहे. कारण काय तर हा त्यांची आई अनुराधाताई शरद काळे यांचा स्मृतिदिन आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वडिलांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत अमर काळे हे विधानसभेसाठी उभे झाले होते. तेव्हा प्रचाराची पूर्ण कमान अनुराधाताई यांनीच सांभाळली होती, असे त्यांचे स्नेही सांगतात. पुढे आईच निवडणुकीची जबाबदारी स्वीकारत. कुठे प्रचारात अडले तर त्याच काम मार्गी लावत होत्या, असे सांगितल्या जाते. आपल्यावर आईचा आशीर्वाद नेहमीच राहला. त्यांचा स्मृतिदिन मला जुन्या आठवणींना जागे करून जातो. त्यामुळे एका नव्या रिंगणात म्हणजेच लोकसभा निवडणुकीत मी प्रथमच उतरतोय, म्हणून आईच्या स्मृतीस नमन करीत या कार्यास सुरुवात करणार, असे अमर काळे म्हणतात.

हेही वाचा…यवतमाळ : शिवजयंती उत्सवाच्या आयोजकावर आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा

त्यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आहे. मात्र त्यांच्या प्रचाराची दारोमदार इंडिया आघाडीने स्वीकारली आहे. आर्वीचे असलेले अमर काळे प्रथमच लोकसभा निवडणुकीमुळे वर्धेत आसन मांडणार. त्या अनुषंगाने त्यांनी प्रचार कार्यालय पाहणे सुरू केले. स्वाध्याय मंदिरात ते व्यवस्था पाहून आले. लगतच वर्षा तिगावकर यांचे पाहुणचार हे झुणका भाकर केंद्र असल्याने कार्यकर्त्यांची सोय लावणे सोयीचे ठरू शकते, असा विचार झाला. आणखी पण जागा लवकर ठरविणे आवश्यक आहे. कारण अर्ज भरण्यासाठी रॅली काढायची कुठून हा प्रश्न असल्याचे शेखर शेंडे यांनी सांगितले. दोन एप्रिल रोजी आईच्या स्मृतीस अभिवादन करीत कूच करणार असल्याचे ठरले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amar kale ncp sharad pawar s candidate for wardha lok sabha seat going to file nomination on mother s remembrance day pmd 64 psg