अमरावती : संपूर्ण राज्‍यात दीर्घकाळ चालणारी यात्रा म्‍हणून ओळख असलेल्‍या बहिरमच्‍या यात्रेला आजपासून उत्‍साहात प्रारंभ झाला. शेकडो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र बहिरम येथे विधिवत पूजा करण्यात आली.

सर्वप्रथम बहिरमबुवाच्या मूर्तीला शेंदूर, दूध-दही, मध व लोण्याचा अभिषेक करण्यात आला. पूजेनंतर मंदिरासमोरील यज्ञात पूर्णाहुती देण्यात आली. होमहवन व आरती करून रोडग्याचा नैवेद्य बहिरमबुवाला दाखवण्यात आला. त्यानंतर शंखनाद करून यात्रेचे नारळ फुटले.

Farmers in Washim district are cultivating chia crop along with traditional crops
वाशीम जिल्ह्यात पीक लागवडीच्या नव्या वाटा; ‘या’ पिकाला मिळतोय चांगला भाव
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Samruddhi Highway Thane Nashik tunnels Warli painting
समृद्धी महामार्गावरील बोगद्यांना आकर्षक चित्रांचा साज, ठाणे – नाशिकला जोडणाऱ्या बोगद्यावर स्थानिक वारली चित्रकलेचा आविष्कार
farmer cabbage farm destroyed
कोल्हापूर : दर घसरल्याने शेतकऱ्याने कोबीवर ट्रॅक्टर फिरवला
Mandhardev , Kalubai yatra, devotees ,
मांढरदेव यात्रेला सुरुवात, ‘काळूबाई’च्या जयघोषात हजारो भाविक दाखल
Changes in traffic on national and state highways on occasion of Jijau Jayanti
जिजाऊ जयंतीनिमित्त ‘या’ राष्ट्रीय, राज्य महामार्गावरील वाहतुकीत बदल
monolith monuments found in kumbhavade village,
राजापूरातील कुंभवडे येथे जांभ्या दगडात आढळली सात एकाश्मस्तंभ स्मारके
general administration department issued a circular on national heroes anniversaries opposed by mahanubhava corporation
सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींच्या प्रतिमा पूजनावरून वाद! राज्य शासनाच्या ‘या’ निर्णयाला विरोध…

हेही वाचा – “… तर विरोधी पक्षनेतेपदासाठी अर्ज करू”, वडेट्टीवारांचे विधान; काँग्रेस कार्यालयावरील हल्ल्यावरून भाजपवर निशाणा

बहिरमबाबांच्या दर्शनाला दरवर्षी हजारो भाविक येतात. विदर्भातच नव्हे तर संपूर्ण राज्यात ही यात्रा प्रसिद्ध असल्याने भक्तमंडळी सलग दीड महिना देवदर्शन व यात्रेचा लाभ घेते. शुक्रवारी (ता. २०) बहिरम बुवाच्या महापूजेला सुरुवात झाली. शिव मंदिर, हनुमान मंदिर, महागणपती मंदिर याठिकाणी अभिषेक करण्यात आला.

ही यात्रा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चालते. गूळ, रेवडी, लाह्या, फुटाणे व नारळ हा बहिरमबुवाचा आवडीचा प्रसाद. त्यासह लोणी व शेंदूर हा विशेष मान असतो. भाविक त्याची श्रद्धा अर्पण करताना आलू-वांग्याची भाजी व रोड्ग्याचा नैवेद्य चढवतात. गवळी बांधवांसह आदिवासींचेसुद्धा बहिरम हे श्रद्धास्थान आहे. आदिवासी बांधव बहिरमबुवाला गुळ-भाकरचा नैवेद्य चढवतात. बोकड अर्पण करून त्याचा बळी देण्याची प्रथा होती. संत गाडगेबाबा, राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी केलेल्‍या प्रबोधनानंतर लोकांचे मनपरिवर्तन झाले. प्राण्यांचा बळी देण्याची प्रथा बंद झाली.

बहिरमच्‍या यात्रेचा इतिहास

अमरावती जिल्ह्यातील कौडिंण्यपूरचा संदर्भ बहिरमशी जोडला जातो. भगवान श्रीकृष्ण व कौडिंण्यपूर राजा रुख्मी यांच्या दरम्यान युद्ध झाले होते. तेव्हा बलराम यांच्या सैन्यात गवळ्यांचा समावेश होता. ते सैनिक म्हणजेच गवळी वऱ्हाडात थांबले. ते गवळी बांधव बहिरम डोंगराच्या पायथ्याशी हेटी करून राहू लागले. त्या हेटीचे गवळ्यांच्या गावात रूपांतर झाले. त्या तीर्थस्थळावर बहिरमबुवाची म्हणजेच भैरवाची मूर्ती बघण्यास मिळते. फार पूर्वी भैरवनाथाच्या मूर्तीसमोर सुपारी ठेवली जाई. गवळ्यांचे वास्तव्य असल्याने दुधदुभते भरपूर. ते गवळी लोक त्यांच्या दैवताला प्रसन्न करण्यासाठी त्यांच्या घरचे लोणी आणि त्यासोबत शेंदूर सुपारीला लावत. ती परंपरा होऊन गेली होती.

हेही वाचा – मराठी भाषिकांना फ्लॅट न देणाऱ्यांवर कारवाई करा – आदित्य ठाकरे

खवय्यांसाठी मेजवानी

यात्रेत हंडीतील मटण आणि रोडगे प्रसिद्ध आहेत. खवय्यांसाठी ही यात्रा एक मेजवानी ठरते. हंडीतील मटण किंवा वांग्याची भाजी आणि रोडग्याचा आस्वाद घेण्यासाठी दूरदूरवरून भाविक या ठिकाणी येतात. मांसाहारी खानावळी यात्रेत असतात. चुलीवरची गरमागरम भाकर हे आकर्षण असते. काही खवय्ये मित्रपरिवारासह राहुटीमध्ये सहभोजनाचे आयोजन करतात. बहिरमच्या रोड्ग्याच्या जेवणासाठी लोक शनिवार-रविवारी दूर अंतर पार करून बहिरमला येतात.

Story img Loader