आमची चिंता आम्ही करू, तुम्ही काय गमावले ते बघा. तुमचे पती मुख्यमंत्रीपदावरून उपमुख्यमंत्री पदावर आले,’ अशा शब्दात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अमृता फडणवीस यांना प्रत्युत्तर दिले. अकोल्यात पक्षाचा आढावा घेण्यासाठी ते आले असता प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

हेही वाचा- धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याला ‘ते’च जबाबदार ; आमदार संजय गायकवाड

अमृता फडणवीस यांनी रविवारी ट्विटच्या माध्यमातून शिवसेनेवर टीका केली होती. यामध्ये त्यांनी शिवसेनेला आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का कोणता? असा प्रश्न करून त्याला चार पर्याय देत खोचक टोले लगावले होते. त्याला दानवेंनी प्रत्युत्तर दिले. ‘आमचे आम्ही बघून घेऊ, तुम्ही काय-काय गमावले ते बघा, आमचं टेंशन घेऊ नका,’ असे दानवे म्हणाले.

हेही वाचा- नागपूर : टाटा उद्योग समूहाच्या विस्तारासाठी ‘मिहान’ योग्य ; नितीन गडकरी

दानवे यांनी जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक घेऊन जिल्ह्यातील प्रश्नांचा आढावा घेतला. शालेय पोषण आहाराच्या प्रश्नावर त्यांनी नाराजी व्यक्त केली. शेतकरी आत्महत्या, अतिवृष्टी, नुकसान भरपाई, स्वस्त धान्याचे वितरण आदींची त्यांनी माहिती घेतली. यावेळी वरिष्ठ अधिकारी व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. पदाधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चा करून चिन्ह गोठवले गेले तरी चिंता करू नका, असा सल्ला दिला.

अब्दुल सत्तार ही विकृती

अब्दुल सत्तार आणि मुख्यमंत्र्यांच्या स्वीय सहायकामध्ये झालेल्या कथित वादावरदेखील त्यांनी भाष्य केले. अब्दुल सत्तार ही विकृती आहे. ते कुठेही गेले तरी तसेच वागतील. ही तर सुरुवात आहे, आणखी ते कुणा-कुणाला शिव्या देतात ते पहा, असा टोला अंबादास दानवे यांनी सत्तारांना लगावला.