नागपूर : शहरातील नागरिक पावसाळ्यात ज्या अंबाझरी तलावाच्या सांडव्यावरून वाहणाऱ्या पाण्याची (ओव्हरफ्लो) प्रतिक्षा करत असतात, त्या अंबाझरी तलावाला गेल्या काही महिन्यांपासून जलपर्णी वनस्पतीचा विळखा बसला आहे. ही वनस्पती तलावासाठी धोकादायक असून यामुळे तलावाचे अस्तित्त्व नाहीसे होण्याची भीती पर्यावरणतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

सौंदर्यीकरणात हरवलेल्या फुटाळा तलावालादेखील काही वर्षांपूर्वी जलपर्णीचा विळखा बसला होता. सौंदर्यीकरणात या तलावाचे मुळ रूप नाहीसे झाले तरी त्यातली जलपर्णी वनस्पती बऱ्याच प्रमाणात नाहीशी करण्यात महापालिकेला यश आले. मात्र, आता शहरातील पर्यटनस्थळ म्हणून उदयास आलेल्या अंबाझरी तलावात जलपर्णी वनस्पतीचा विळखा वेगाने घट्ट होत चालला आहे. सांडपाणी त्यासाठी कारणीभूत ठरत असल्याचे शहरातील पर्यावरणतज्ज्ञांचे मत आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या मूसळधार पावसामुळे अंबाझरी तलावाचा स्वामी विवेकानंद स्मारकाजवळील भाग ओव्हरफ्लो झाला. मात्र, या परिसरात मोठ्या प्रमाणात जलपर्णी असल्याने हा ओव्हरफ्लो नेहमीप्रमाणे नव्हता. त्यामुळे काही उत्साही तरुणांनी तेवढ्याच भागातील ही वनस्पती काठीने दूर सारण्याचा प्रयत्न केला. मात्र, ही काढलेली वनस्पती त्याच ओव्हरफ्लोमधून खाली टाकण्यात येत होती. आताही काही उत्साही तरुण तेवढाच परिसर स्वच्छ करून त्यात तलावात पोहण्याचा आनंद घेत आहेत. तर येथे मासेमारी करणारे काही तरुण तसेच व्यावसायिक मच्छिमार काडीने ही वनस्पती दूर सारण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, ही तात्पुरती व्यवस्था असून ही वनस्पती तलावाच्या खालीदेखील तेवढ्याच वेगाने वाढते आणि त्यामुळेच या तलावाची ऑक्सीजनची पातळी कमी होऊन येथील मास्यांसाठीदेखील ते धोकादायक ठरत आहे.

uran karanja road potholes
उरण-करंजा मार्गाची दुरवस्था कायम
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Sindhudurg rain
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पाऊसाची हजेरी, बागायतदार चिंतेत
Uran, air pollution Uran,temperature, humidity Uran,
हवा प्रदूषणाचा मुद्दा निवडणुकीतून गायब? उरणमधील वाढते हवा प्रदूषण, तापमान आणि आर्द्रतेचा नागरिकांच्या शरीरावर परिणाम
India Meteorological Department has warned a rain alert for 15 districts of Maharashtra state
‘या’ १५ जिल्ह्यांना १५ नोव्हेंबरला सतर्कतेचा इशारा !
Onion producers suffer due to losses consumers suffer due to price hike nashik news
नुकसानीमुळे कांदा उत्पादक, तर दरवाढीमुळे ग्राहक त्रस्त; कांदा शंभरीवर
The Meteorological Department has given the forecast of rain in the state of Maharashtra
थंडी सुरू झाली नाही की आता पाऊस येऊन धडकणार…राज्यातील या भागात…

हेही वाचा – काँग्रेसचे ओबीसी समाजाला बळ, प्रदेशाध्यक्ष व विरोधी पक्षनेते दोन्ही समाजाकडे

या तलावात यापूर्वीदेखील सांडपाणी येत असल्याचे समोर आले होते. तसेच औद्योगिक क्षेत्रातूनही कारखान्याचे रसायनयुक्त पाणी या तलावात येत असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे आधी हे सांडपाणी व रासायनिक पाण्याचे प्रवाह थांबवणे आवश्यक आहे. या तलावाच्या ओव्हरफ्लोमधून खाली टाकली जाणारी वनस्पती अधिक धोकादायक आहे. कारण या प्रवाहाचे पाणी नागनदीत जाते आणि या पाण्यावाटे ही वनस्पती नागनदीत गेली, तर पावसाचे पाणी अडकून पडेल. परिणामी आधीच पाण्यात तुंबणारे शहरातील रस्ते पुराच्या पाण्यात तुंबण्याची शक्यताही पर्यावरणतज्ज्ञांनी व्यक्त केली.

हेही वाचा – चंद्रपूर : इरई नदीपात्रात रेड व ब्लू झोनमध्ये उभ्या राहिल्या वसाहती; पूरग्रस्त भागात बंदी असतानाही दरवर्षी हजारो अवैध बांधकाम, प्लॉटची विक्री

अंबाझरी तलावात जलपर्णी ज्या गतीने वाढत आहे, त्याचा अर्थ तलावात सांडपाणी येत आहे हे नक्की. त्यातील नायट्रोजन, फॉस्फरस हे घटक वनस्पतीच्या वाढीसाठी कारणीभूत ठरतात. ही वनस्पती तलावाच्या वरच नाही तर तलावाच्या आतदेखील त्याची मूळे घट्ट झालेली असतात. त्यामुळे तलावाचे ऑक्सीजन कमी होते. त्यामुळे या तलावातून ही वनस्पती काढून होणार नाही तर मूळापासून ते वैज्ञानिक पद्धतीने नाहीशी करावी लागणार आहे. अन्यथा या तलावाचा श्वास पूर्णपणे गुदमरण्याची शक्यता नाकारता येत नाही. – कौस्तुभ चटर्जी, संस्थापक, ग्रीन व्हिजिल फाउंडेशन