चंद्रपूर : कोरपना तालुक्यातील लखमापूर येथे मे. अंबुजा सिमेंट लि. मराठा लाईमस्टोन खाणीमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होणार आहे. त्यामुळे लगतच्या दहा ते बारा गावातील ग्रामस्थांना सातत्याने प्रदूषणाचा त्रास होणार आहे. तेव्हा या लाईमस्टोन माईन्सला परवानगी देऊ नये, अशी मागणी या भागातील ग्रामस्थांनी केली आहे. या लाईमस्टोन माईन्ससाठी पर्यावरणविषयक जाहीर जनसुनावणी सोमवारी (३ फेब्रुवारी) सकाळी ११ वाजता आयोजित केली आहे. मे. अंबुजा सिमेंट लि. मराठा लाईमस्टोन माईन यांनी बार्खडी, उपरवाही, चांदूर, पिंपळगाव, लखमापूर आणि धुत्रा (ता. कोरपना) आणि सोनपूर (ता. राजुरा), जि. चंद्रपूर या गावांमध्ये मराठा लाईमस्टोन माईन-२, (एमएल क्षेत्र-८८०.३१ हेक्टर) मधील लाईमस्टोन प्रॉडक्शन कपॅसिटी (चुनखडी उत्पादन क्षमता) २.० दशलक्ष टीपीए विस्तार, पृष्टभागावरची माती ०.२५ दशलक्ष, कचरा/ अपव्यय (ओबी/आयबी) २.४० दशलक्ष टीपीए, सवग्रेड ०.५० दशलक्ष टीपीए (एकूण खोदकाम ६.६५ दशलक्ष टीपीए), एकूण खोदकाम ६.६५ दशलक्ष टीपीए ) विस्तारी प्रकल्पाच्या प्रस्तावाबाबत पर्यावरणविषयक जनसुनावणी घेण्यात येत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा