नागपूर : भाजप नेत्या सना खान यांची हत्या करणारा जबलपूरमधील कुख्यात दारु माफिया आणि वाळू तस्कर अमित ऊर्फ पप्पू शाहू याला अखेर अटक करण्यात आली आहे. आठ दिवसांपूर्वी भाजप नेत्या सना खान यांचा जबलपूरमध्ये खून झाला होता. अमितने सनाचा मृतदेह हिरण नदीत नदीत फेकल्याची कबुली दिली आहे. या घटनेनंतर अमित ढाबा बंद करून पसार झाला होता. त्याचा शोध जबलपूर आणि नागपूर पोलीस शोध घेत होते. शेवटी नागपूर पोलिसांनी अमित साहूला शुक्रवारी अटक केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जबलपूरमध्ये अमित शाहू हा रेती चोरी करून अवैध मार्गाने तस्करी करतो. तसेच अवैध दारु विक्रीची टोळी संचालित करतो. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल असून तो कुख्यात गुंड म्हणून ओळखला जातो. त्याच्याशी भाजप नेत्या सना खान हिची ओळख झाली. २ ऑगस्टला सना खान या नागपूरमधून जबलपूरला अमितच्या भेटीला गेल्या. अमितकडून सना यांना ५० लाख रुपये घेऊन परत यायचे होते. मात्र, २ ऑगस्टपासून सनांचा भ्रमणध्वनी बंद येत होता. त्यांच्या आईला संशय आल्याने त्यांनी मानकापूर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. अमित शाहू अचानक हॉटेल बंद करून नोकरासह बेपत्ता झाल्याने पोलिसांना संशय आला. नागपूर पोलिसांनी अमितचा नोकर जितेंद्र गौडला अटक केली. त्याने अमितच्या कारच्या डिक्कीत रक्त होते. ती कार स्वच्छ केल्याची कबुली दिली होतह. अटकेनंतर अखेर अमित साहू यानेही सना खान यांचा खून केल्याची कबुली दिली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amit dhaba who killed bjp leader sana khan was finally arrested in nagpur adk 83 amy
Show comments