नागपूर : जामठा येथील राष्ट्रीय कॅन्सर इन्स्टिट्यूटचा (एनसीआय) लोकार्पण समारंभ २७ एप्रिलला सकाळी १०.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे. याप्रसंगी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत एकाच मंचावर असतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

डॉ. आबाजी थत्ते सेवा आणि अनुसंधान केंद्राद्वारे संचालित जामठा येथील ‘एनसीआय’च्या लोकार्पण समारंभाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी हेही उपस्थित राहतील.

हेही वाचा – वर्धा : स्फोटकांच्या आवाजाने शहर हादरले…

या कार्यक्रमात केवळ निमंत्रितांनाच प्रवेश राहणार असल्याचे प्रसिद्धीपत्रकातून ‘एनसीआय’चे महासचिव शैलेश जोगळेकर यांनी स्पष्ट केले. हे रुग्णालय गेल्या अनेक वर्षांपासून रुग्णसेवेत असून येथे मोठ्या संख्येने कर्करुग्णांवर उपचारही होत आहेत, हे विशेष.