चंद्रपूर : जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदार संघातील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांची स्थानिक चांदा क्लब ग्राऊड येथे जाहीर सभा झाली. वेळेअभावी अवघ्या पाच मिनिटाचे भाषण करून शहा नागपूरच्या दिशेने रवाना झाले. तत्पूर्वी मंचावर जोरदार भाषण करताना शहा यांनी चंद्रपूरचे भाजप उमेदवार किशोर जोरगेवार यांना विजयी करण्याचे आवाहन केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

त्यांच्या विजयी मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी आपण स्वतः येऊ असेही शहा म्हणाले. जोरगेवार यांना विजयी करण्याचे आवाहन करताना शहा मंचावर उपस्थित बल्लारपूर मतदार संघाचे उमेदवार तथा राज्याचे वन व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, राजुराचे उमेदवार देवराव भोंगळे व वरोराचे उमेदवार करन देवतळे यांना विजयी करा असे आवाहन मतदारांना करण्यास विसरले.

हेही वाचा…‘महाभारताचा’ उल्लेख करत फाशीची शिक्षा, उच्च न्यायालयाचे सत्र न्यायालयावर ताशेरे…

भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा यांनी त्यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. त्यावर अमित शहा यांनी सुधीर भाऊ को कोण नही पहचानता, उन्हे सब लोग जाणते है असा संदेश दिला. तसेच सुधीर मुनगंटीवार यांना विजयी करण्याचे आवाहन केले. सोबतच देवराव भोंगळे व करन देवतळे यांनाही विजयी करण्याचे आवाहन केले व सभा मंच सोडून नागपूरला निघून गेले. राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार इन्हे कोण नही जाणता हे वाक्य आहे केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांचे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amit shah forgot to urge voters to elect sudhir mungantiwar rajura s bhongle and varoras devtale rsj 74 sud 02