नागपूर : महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी भारतीय जनता पक्षाने कंबर कसली आहे. पक्षातील सर्व प्रमुख नेत्यांनासोबत घेऊन प्रचार रणनीती ठरवली जात आहे. त्याच मोहिमेचा एक भाग म्हणून भाजपचे शक्तीशाली नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. मंगळवारी ते नागपूरमध्ये विदर्भातील सर्व ६२ विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहेत. मात्र त्याच वेळी महाराष्ट्रातील भाजपचे प्रभावी नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या बैठकीला हजर राहणार नाहीत, ते जम्मू आणि काश्मिरमध्ये निवडणूक प्रचार सभेला गेले आहेत. त्यामुळे गडकरीना राज्याच्या निवडणुकीपासून दूर ठेवले जात आहे का ? याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहे.

विदर्भ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. या भागात विधानसभेच्या तब्बल ६२ जागा आहेत. गडकरी यांचा विदर्भातील बहुतांश मतदारसंघावर प्रभाव आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला विदर्भात फटका बसला, महाविकास आघाडीची सरशी झाली होती. हीच स्थिती विधानसभा निवडणुकीत राहू नये म्हणून गडकरींनासोबत घेण्याच्या हालचाली मधल्या काळात भाजपमध्ये सुरू झाल्या होत्या. गडकरींना निवडणूक प्रचारात सहभागी करून घेतले जाईल, असे खुद्द भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसार माध्यमांना सांगितले होते. प्रत्यक्षात कृतीत असे दिसून आले नाही. विदर्भातील पक्षाच्या निवडणुकीची रणनिती ठरवण्यासाठी अमित शहा २४ सप्टेबरला नागपुरात असताना गडकरी मात्र जम्मू काश्मिरच्या प्रचार दौऱ्यावर आहेत. तेथील बसोहली विधानसभा मतदारसंघात त्यांनी मंगळवारी प्रचार सभा घेतली. हा गडकरींचा पूर्वनियोजित दौरा होता की त्यांना नागपूरच्या आढावा बैठकीचे निमंत्रणच देण्यात आले नाही, असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे.

Anil Deshmukh criticized BJP and amit shah
बोलघेवडेपणा करू नका!अमित शहा यांच्या नेत्यांना कानपिचक्या
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Shiv Sena UBT to contest local elections independently
महापालिका निवडणुकांआधी मविआत फूट? ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईत स्वबळावर लढणे कितपत शक्य?
Chandrakant Khaire
Chandrakant Khaire : “हात जोडून विनंती करतो, उद्धव ठाकरेंची साथ सोडू नका”, चंद्रकांत खैरेंचं व्यासपीठावर कार्यकर्त्यांना दंडवत
Image Of MVA
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ठाकरे गटाच्या स्वबळाच्या भूमिकेमागे नेमकी कारणं काय?
santosh deshmukh latest news in marathi
‘‘संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना फाशी द्या”, वाशीममध्ये सर्वपक्षीय मोर्चात मूक आक्रोश
Vijay Wadettiwar On Thackeray group
Vijay Wadettiwar : “आम्ही उद्धव ठाकरेंना विनंती करू, अन्यथा…”, ठाकरे गटाच्या स्वबळाच्या घोषणेवर विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान
Akola Municipal Corporation Election news in marathi
अकोला महापालिकेतील ‘प्रशासक राज’ केव्हा संपणार?; संभाव्य निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी, वर्चस्व राखण्याचे भाजपपुढे आव्हान

हेही वाचा – काँग्रेस नेत्या रश्मी बर्वेंना लोकसभा निवडणुकीपासून वंचित ठेवणारा निर्णय अवैध

नागपुरातील सुरेश भट सभागृहात अमित शहा यांचा कार्यकर्ता संवाद कार्यक्रम होत असून त्याला गडकरी वगळता विदर्भातील भाजपचे सर्व प्रमुख नेते उपस्थित आहेत. त्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुुळे, सर्व जिल्ह्यातील भाजपचे प्रमुख पदाधिकारी व अन्य नेत्यांचा त्यात समावेश आहे. या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर लावण्यात आलेल्या फलकावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या बाजूला गडकरी यांचे छायाचित्र आहे. पण गडकरी अनुपस्थित आहे. याची भाजप कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे.

हेही वाचा – न्यायालय म्हणाले, “पतीने पत्नीला सुनावणे चुकीचे नाही….”

गडकरींना दूर ठेवले जात आहे का ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नुकताच विदर्भात वर्धा येथे कार्यक्रम झाला. त्याला गडकरी उपस्थित नव्हते. त्यामुळे गडकरी यांना महाराष्ट्रात निवडणूक प्रचारापासून दूर ठेवले जात आहे का ? असा सवाल कार्यकर्ते करीत आहेत.

Story img Loader