चंद्रपूर : अंधार पडल्यावर सायंकाळी सहा वाजतानंतर हेलिकाॅप्टर उडणार नाही, या भितीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा केवळ पाच मिनिट जाहिर सभेला मार्गदर्शन करून निघून गेले. या पाच मिनिटांच्या सभेची व नाराजीची चर्चा आता सर्वत्र सुरू झाली आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राज्यात यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड, हिंगोली व चंद्रपूर अशा तीन सभा होत्या. या तिन्ही सभास्थळी शहा हेलिकाॅप्टरने पोहचले. चंद्रपुरची सभा सायंकाळी चार वाजताच्या सुमारास होती. चंद्रपुरातील मोरवा विमानतळावर सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास पोहचले.

Sadhguru disheartened over Parliament disruptions on adani issue
Sadhguru on Adani: ‘उद्योगपतींवरून संसदेत रणकंदन नको’, अदाणींना समर्थन देत सद्गुरुंनी व्यक्त केली नाराजी
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Mahavikas Aghadi
Sanjay Shirsat : ‘मविआ’ला धक्का बसणार? “अनेकजण शिवसेना, भाजपाच्या संपर्कात”, शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा
Eknath Shinde
Eknath Shinde : “…पण ते पुन्हा आले”, देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख करत एकनाथ शिंदेंनी केलं राहुल नार्वेकरांचं अभिनंदन!
Order to seize Ajit Pawar property cancelled Mumbai news
शपथ घेतली, चिंता मिटली; अजित पवारांना दिलासा, मालमत्तेवर टाच आणण्याचा आदेश रद्द
Ajit Pawar on Mahavikas Aghadi MLA's Oath as a Maharashtra Legislative assembly Member
“मविआ आमदारांना उद्या शपथ घ्यावीच लागेल, अन्यथा…”, अजित पवारांचा इशारा
readers feedback on loksatta editorial
लोकमानस : नाही तर ईडी, सीबीआय आहेतच!
Sanjay Shirsat On Mahayuti Cabinet Politics :
Sanjay Shirsat : मंत्रिमंडळ विस्ताराबाबत शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, “मंत्रिपदे देताना…”

हेही वाचा…अल्पवयीन पत्नीसोबत सहमतीतून शारीरिक संबंध बलात्कारच, उच्च न्यायालय म्हणाले, ‘पीडितेच्या इच्छेविरोधात…’

त्यानंतर तिथून थेट सभास्थळी चांदा क्लब ग्राऊंड येथे पोहचले. ४ वाजून ५५ मिनिटांनी सभास्थळी दाखल झाले व मंचावर येताच थेट भाषणाला सुरूवात केली. अगदी पहिल्याच वाक्त्यात त्यांनी पाच मिनिट चंद्रपुरकरांसोबत आहे, त्यानंतर मी निघून जाईल तेव्हा तुम्ही वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर व चंद्रपूरचे उमेदवार आमदार किशोर जोरगेवार यांची भाषणे ऐका असे सांगितले.

अवघ्या पाच मिनिटांच्या भाषणानंतर शहा सभास्थळाहून निघून गेले. हिवाळा सुरू झाला आहे. त्यामुळे अंधार लवकर पडतो व अंधारात हेलिकाॅप्टर उडत नाही. याची जाणीव ठेवूनच शहा सभास्थळी दाखल झाले व पाच मिनिटात निघून गेले. सायंकाळी सहा वाजतानंतर हेलिकाॅप्टर उडले नाही आणि कारने नागपूरला जावे लागले तर समोरचा दौरा रद्द करावा लागेल. त्यामुळेच शहा अतिशय घाई घाईत भाषण करून निघून गेले.

आता त्यांच्या या पाच मिनिटांच्या भाषणाची, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये सुरू झालेल्या नाराजीची चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे. भाषण करतांना त्यांनी जिल्ह्यातील सहाही उमेदवारांचा नामोल्लेख देखील व्यवस्थित केला नाही. याचीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. तसेच शहांच्या सभेची तुलना कॉग्रेसच्या गांधी चौकातील विरोधी पक्ष नेेते विजय वडेट्टीवार व कॉग्रेस नेते खासदार मुकूल वासनिक यांच्या सभेसोबत देखील होतांना दिसत आहे. अंधार पडण्यापूर्वीच शहा मोरवा विमानतळ येथे पोहचले व तिथून ते हेलिकाॅप्टरने नागपूरच्या दिशेने रवाना झाले.

हेही वाचा…‘तुमच्या उमेदवाराच्या…’ॲड. प्रकाश आंबेडकर व राहुल गांधींमध्ये नेमकी काय चर्चा

पाच मिनिटांच्या सभेसाठी येथे भाजपाच्या वतीने चांगलीच तयारी करण्यात आली होती. मात्र, शहा लवकर निघून गेल्याने सभास्थळी नाराजी स्पष्टपणे दिसून येत होती. तसेच शहा निघून गेल्यानंतर लोकही निघून गेल्याने अवघ्या काही मिनिटात चांदा क्लब ग्राऊंड मोकळे मोकळे दिसत होते. जणू काही इथे सभा झालीच नाही अशीच काहीशी स्थिती होती.

Story img Loader